शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी
शाळा संपल्यावरचं कळते
खरी गंमत काय असते
पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच्या रडण्यात
आपले जगलेले जीवन असते
अनोळखी चेहरे नंतर जिव्हाळ्याचे होतात
काही नाती आयुष्यभरासाठी मिळून जातात
खेळण्यांसाठी होणाऱ्या भांडणातूनच
मैत्रीचे संबंध वाढत जातात
सुट्ट्यांची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो
महिनाअखेर, श्रावणी सोमवार का असेना…
Half day मध्ये सुद्धा आम्ही समाधानी असतो
कॉलेजला रिकामे असणारे first bench
शाळेत मात्र नेहमी भरलेले असतात
पहिल्या bench वर कोण बसणार
यासाठी सुद्धा स्पर्धा लागतात
मित्रांचा डबा चोरून खाण्यातच तर खरी गंमत असते
मधल्या सुट्टीत डबा खाण्यापेक्षा
आपल्याला ग्राउंड वर जाण्याचीच
जास्त घाई असते
संध्याकाळी क्रिकेट खेळल्यानंतर
अभ्यास करायचा मूड कुठे असतो
नेहमीच्या अपूर्ण गृहापाठमुळे
हातावर छडीचा वळ असतो
मुलामुलींच्या जोड्या लावणं
हे आमचं खूप आवडीचं काम असतं
पण आपल्याला जर कोणी चिडवलं
तर मात्र आम्हाला कधीच ऐकून घ्यायचं नसतं
प्रत्येक off period ला आमचा
PT साठी आरडाओरडा असतो
बाहेर पाऊस पडत असेल
तर वर्गात बेंचवर पेन फाईट खेळण्यातसुद्धा
आम्ही समाधानी असतो
एरवी दंगा करणारे आम्ही
रिझल्टच्या दिवशी मात्र एकदम शांत असतो
कधी देवळात न जाणारे आम्ही
त्या दिवशी मात्र
देवा ! फर्स्ट क्लास मिळू दे रे
एवढंच विनवत असतो
आता मात्र गेले ते दिवस, उरल्या त्या फक्त आठवणी
अस म्हणण्या शिवाय दुसरं काही उरलं नाही
आता आपलं ते School Life संपलं,
फक्त आठवणीत रमण्याशिवाय पर्याय नाही
– _प्रतिक प्रविण म्हात्रे_
सुंदर
Kharach hi kavita vachun thoda vel punha sagla anubhavla…tya shalechya sundar aathvanit ramlo 😍
Khup sundar👌👌