मैत्री

मैत्री म्हणजे काय?
आपल्या विचारात
सतत कोणाचं तरी येणं असतं
न सांगता समोरच्याला
आपल्या मनातलं कळणं असतं

कधीही न तुटणारं हे
दोन जीवांच नात असतं
संकटाच्या वेळी धावून जाणं
हे यातलं कर्तव्य असतं

पकडले गेल्यावर
मित्रांची नावे न सांगणे
हि आपली जबाबदारी असते
पकडल्या गेलेल्या मित्राची साथ
मात्र कधी सोडायची नसते

Gf/bf आल्यावर मैत्री न विसरणं
हि यातली unsigned deal असते
वहिनी जिजू चिडवणं
यातच तर खरी गंमत असते

मैत्री हि काही ठरवून करायची गोष्ट नसते
पण एकदा का मैत्री केली
कि मग मात्र ती आयुष्यभर निभावायची असते

मैत्री म्हणजे फक्त
Sharing नसतं
आपल्या मित्राच्या भावना
स्वतःच्या समजणं असतं

मैत्री म्हणजे नुस्तं good friend,best friend नसतं
आपण त्याच्या किती जवळचे आहोत
हे आपणचं समजून घ्यायचं असतं

मैत्रीत काही द्यायचं नसतं
काही घ्यायचं नसतं
ते फक्त एक विश्वासच नातं असतं
न सांगता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असतं

_                                 प्रतिक प्रवीण म्हात्रे

1070cookie-checkमैत्री

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

8 Comments

  1. I liked it pratil awe some work done by u gud job keep it up n my bst wishes r wid u

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories