
सगळं तसंच आहे अजून
सगळे म्हणतात
मोठे झालात तुम्ही
पण फक्त गोष्टी बदलल्या आहेत
बाकी काही नाही
अजूनही मातीतच खेळतो आम्ही
फक्त खेळ बदलले,जागा नाही
आधी लंगड़ी, बॅटबॉल
आता बास्केट बॉल,फुटबॉल
शाळेची जागा कॉलेज ने घेतली
यूनिफ़ॉर्म च्या जागी t-shirt जीन्स आली
कंपासपेटीची जागा एका पेनाने घेतली
टिफ़िन ची जागा कॅन्टीन ने
मित्र बदलले,priorities बदलल्या
भावना अजूनही त्याच आहेत
पूर्वी शाळेत व्यायाम करायला कंटाळा करायचो
आता जिम मध्ये जाण आम्हाला भारी वाटत
आई,बाबांच्या जागी mom dad आले
पण माणसं अजूनही तीच आहेत
काळजी ही त्यांना पहिल्या इतकीच् आहे
फक्त त्यांनी ती दाखवणं कमी केलय
वय वीस वर्ष झाल
तरी अजुन सवयी मात्र त्याच आहेत
कोण म्हणतं मोठे झालो
लहानच आहोत आम्ही अजुन
पण फक्त गोष्टी बदलल्या आहेत
बाकी काही नाही
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Awesome n true lines Prtik