
पहिला पाऊस
काल पहिला पाऊस आला
आणि क्षणात लहानपणीच्या
सगळ्या आठवणी समोर आल्या
तेव्हा केलेली मजा
आज पुन्हा एकदा कराविशी वाटली
ते पावसात फिरण
जोरात सायकल चालवण
मित्रांच्या अंगावर पाणी उडवण
साचलेल्या पाण्यात होड्या सोडण
फुटबॉल खेळण
पुन्हा एकदा करावस वाटल
जोरात पाऊस आला की
शाळेला दांडी मारायच
एक हक्काच कारण असायच
सर्दी खोकल्याची पर्वा न करता
पावसात भिजायच
याच आम्हाला भारी अप्रूप वाटायच
सगळीकडे पसरलेला मातीचा सुगंध
पावसात भिजलेल्या पक्षांची कीलबिल
आणि छत्री घेऊन फिरणारी लहान मुले
जणू पावसाची स्वागतच करत असायची
हाच पाऊस मात्र कधी अवेळी आला
की मात्र खुप राग यायचा
नुस्ता चिखल करुन जायचा
पावसाचा हा एक त्रास सोडला
तर मात्र हा नेहमी हवाहवासा वाटायचा
अगदीच पावसात नाही जाता आल
तरी सुद्धा घरात बसून
बाहेरचा पाऊस बघण्यातसुद्धा
फार गंमत वाटायची
लहानपणी केलेली मजा
आज पुन्हा एकदा कराविशी वाटली
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
खुप सुंदर
Khup chaan
Thank you