
Articles
To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे
इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत कागदी डिग्रीच्या पत्रावळीचा तुकडा घेऊन जावं इंटरव्ह्यूला बेशरम लाचार आनंदान ?
की फेकुन द्यावा तो डिग्रीचा कागद कपटातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आणि करावा एखादा नवीन टेक्नॉलॉजीचा कोर्स नोकरी मिळण्याच्या आशेने?
AI, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्पुटिंग किंवा प्रोग्रामिंग..
जुन्या आउटडेटेड अभ्यासक्रमाच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा… की नंतर येणा-या टेक्नॉलॉजीची नसावी कल्पना विद्यार्थ्यांना कधीही..
पण मग..पण मग त्या विद्यार्थ्यांनाच नव्या तंत्रज्ञानाची ओढ लागू लागली तर….? तर…तर…
इथेच मेख आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचं मार्गदर्शन मिळत नाही म्हणुन आम्ही पुन्हा अडकतो त्याच विनोदाच्या कचाट्यात… सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
इंजिनिअरवर होणारे Memes…
चंद्रावर पोहोचूनही 9-5 च्या आयुष्यात अडकल्याची विटंबना
आणि अखेर डोनेशनचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-
यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला ज्यांनी अभ्यासक्रम बदलायला हवा ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला शिक्षणपद्धती प्रमाणे नोकरी द्यावी त्या कंपन्याही आम्हाला विसरतात पण मग गाठीशी अनुभव नसतानामिळालेल्या डिग्रीचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा… आम्ही इंजिनिअर्सनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???
No Comment