
Uncategorized
कार्यकर्ता
मोर्चे, राडे, प्रचार, सभा
आम्ही ओझ्याचे बैल जणू
केला कितीही भ्रष्टाचार, अन्याय
तरीही त्यांना साहेबच म्हणू
पक्षाबाबत निर्णय घेताना
आमचा विचार कोण करतं
काय बरोबर काय चूक
आमचं डोकं कुठे चालतं
येऊ देत साहेबांच्या घरी
पैसे आणि मिठाईची खोकी
आम्हाला फक्त एक आदेश हवा
फोडायला एकमेकांची डोकी
झेंडे घेऊन मोर्चे काढण्यातच
आयुष्य आमचं सरतंय
आमच्या नंतर येऊनही खुर्चीवर
फक्त साहेबांचं पोरगंच बसतंय
इतर वेळी महाग वाटणारं पेट्रोल
प्रचाराच्या वेळी खूपच स्वस्त वाटतंय
गाडीमागे बाईकवरून फिरताना
आमचं भविष्य मात्र अंधारातच राहतंय
©प्रतिलिखित
No Comment