Fake Feminism 🙅🏻‍♀️

Fake Feminism 🙅🏻‍♀️

चारचौघात एखाद्या मुलीने मुलावर हात उचलला तर ‘अरे त्या मुलानेच काहीतरी केलं असेल… ‘, मुलाने स्वतःला वाचवण्यासाठी त्याच मुलीचा हात अडवण्याचा प्रयत्न केला तर ‘लडकी हैं वो, थोडा इज्जत से पेश आओ… ‘

कायद्याने महिलांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचं फॅडच निघालंय हल्ली. कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी समोरच्याची काहीही चूक नसताना लेडी सिंघम बनून एका टॅक्सिवाल्याला मारहाण करण्याचा प्रकार काल परवाच लखनऊ येथे घडला. त्या व्हिडिओ मध्ये ती मुलगी इतक्या स्टाईलमध्ये त्या टॅक्सिवाल्याला मारत होती यावरूनच हे लक्षात येऊ शकतं की हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. हिरवा दिवा असतानाही आपण भारतीय जसे रस्ता आपल्या बापाचाच असल्याचा आव आणून समोरून येणाऱ्या वाहनांना हात दाखवून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न त्या मुलीने केल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून येतंय. पण तरीही त्या टॅक्सिवाल्याला बाहेर उतरवून त्याला मारहाण करण्याचे प्रताप त्या बयेने केले. आश्चर्याची बाब म्हणजे घटनास्थळी पोलीस किंवा तत्सम व्यक्ती उपस्थित असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. यावरून सर्वसामान्य नागरिकांनी असा अर्थ घ्यावा का की कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींना आडकाठी करण्यास कायद्याचे रक्षकच घाबरतात??

अजून किती पुरुषांची आयुष्य त्यांनी न केलेल्या गोष्टींसाठी अशीच बरबाद होणार आहेत. दिल्लीमधील घटना, त्यानंतर झोमॅटोची घटना आणि आता ही लखनऊ मधील आणखी एक घटना. अशा असंख्य घटना समाजात घडत असतील पण सगळ्याच आपल्या समोर येत नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आपण सगळे मिळून जसा आवाज उठवतो तसाच आवाज पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधातसुद्धा उठवायला हवा.

आपल्या सर्वानांच मुलींवर होणाऱ्या अन्यायाची चीड येते. अर्थात ती यायलाच हवी. मग तो मुलीवर झालेला असु दे किंवा मुलावर. ह्यामध्ये जसं मुलींचं आयुष्य बरबाद होतं तसंच मुलींच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे सूड उगवण्याच्या मनस्थितीमुळे एखाद्या निर्दोष मुलाचही आयुष्य बरबाद होऊ शकत. जेव्हा एखाद्या मुलीवर अन्याय होते तेव्हा संपूर्ण जग तिच्या पाठीशी उभं राहतं आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. पण एखाद्या निर्दोष मुलावर खोटे आरोप केले जातात त्या वेळीही जग डोळे, कान बंद करून त्या मुलालाच दोषी ठरवून मोकळे होतं. अर्थात अशी घटना घडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे पण अशा घटना घडतात. मुलींना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्याचा वापर करायलाच हवा. पण त्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये. जो अपराधी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी पण निर्दोष व्यक्तीला आपल्या स्वार्थासाठी अपराधी ठरवलं जाऊ नये. कोणत्याही मुलावर किंवा मुलीवर अशी वेळ आणू नये ज्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बरबाद होईल.

(आजचा लेख लिहिण्याचा उद्देश हाच होता की समाज अजूनही अन्याय हा फक्त मुलींवरच होतो अशा गैरसमजात आहे. आणि कुणी दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की मागचा पुढचा विचार न करता, त्याचे विचार जाणून न घेताच त्याची विचारसरणी कशी महिलांविरोधी आहे हे सांगून मोकळे होतात लोक.)

©प्रतिलिखित

29681cookie-checkFake Feminism 🙅🏻‍♀️

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories