
Uncategorized
समाधान
असमाधानी राहण्याचा जणू
शापच मिळालाय माणसाला
आवश्यक तेवढं मिळूनही
नेहमी दोषच दैवाला
इतरांशी तुलना करण्यातच
आयुष्य त्याचे संपते
दुसऱ्यांना सुखी पाहून
हास्य त्याचे विरते
इच्छिलेले मिळाले तरीही
हाव काही संपत नाही
उपभोग घेऊन झाला तरीही
मन काही भरत नाही
दिले मुबलक नशिबाने
पण निराशा कायम तशीच त्याची
मिळाली अनंत सुखे उपभोगण्यास
पण ओंजळ कायम रितीच त्याची
कधीतरी समजेल का माणसाला
खऱ्या सुखाचा अर्थ
की मृगजळाच्या मागेच जाईल
त्याचे सर्व आयुष्य व्यर्थ
©प्रतिलिखित
No Comment