स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांचं योगदान कधीही विसरता येणार नाही त्यापैकी एक म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’. समस्त क्रांतीकरकांसाठी एक प्रेरणास्थान म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहिलं जातं. नुसतं अहिंसेच्या मार्गावर चालून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये तर त्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, चापेकर अशा अनेक देशभक्तांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलीये. अनेक जणांनी मरणासन्न यातना भोगल्या आहेत. आणि आपल्यासारखे आताचे अनेक जण ज्यांचं देशासाठी काहीच योगदान नाही असे लोकं महापुरुषांबद्दल काहीही बरळत सुटलेत त्यामुळेच आजही हा लेख लिहण्याचा खटाटोप.

गेल्या महिन्यात श्रेया आंबेकरने स्वातंत्रवीर सावरकरांवर एक गीत गायलं होतं. त्या गीताच्या कमेंट्सबॉक्समध्ये काही लोकांनी अक्षरशः लाज वाटेल अशा कमेंट्स केल्या. दोन दिवसांपूर्वी तरन आदर्शने त्यांच्या फेसबुकवर वॉलवर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्रवीर सावरकर’ ह्या चित्रपटाची घोषणा केली. त्या पोस्टचा कमेंटमध्येही अनेक लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफीवीर, ब्रिटिश बाबू, बूटलिकर वगैरे वगैरे बोलून त्यांची खिल्ली उडवलीये.

भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने संसदेत सांगितलं की विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा कुठलाही रेकॉर्ड नाही.

पण तज्ज्ञांच्या मते सावरकरांनी अनेक वेळा इंग्रजांकडून माफी मागितली होती. तसेच त्यांना दर महिन्याला साठ रुपये पेन्शनही मिळत होती.

अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. 11 जुलै 1911 ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि 29 ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर 9 वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. इंग्रजांनी जी काही पावलं उचलली आहेत, त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेवरचा आपला विश्वास दृढ झाला असून आपण आता हिंसेचा मार्ग सोडल्याचं सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं होतं.

जेलमधून बाहेर राहण्यासाठीची रणनीती नंतरच्या काळात सावरकरांनी इंग्रजांकडे माफी मागण्याच्या आपल्या कृतीचं समर्थनही केलं होतं. हा आपल्या रणनीतीचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं. सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं, की जर मी तुरूंगात असहकार पुकारला असता तर माझा भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असता.

भूमिगत राहून जितकं काम करता येईल, तितकं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आपल्या माफी मागण्यावर लोक काय म्हणतील याचा सावरकरांनी विचार नाही केला. आपण तुरूंगाच्या बाहेर राहिलो, तरच आपल्याला हवं ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं.

1924 साली सावरकरांची पुण्यातील येरवडा जेलमधून दोन अटींवर सुटका करण्यात आली. एक म्हणजे ते कोणत्याही राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाहीत आणि दुसरी म्हणजे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते जिल्ह्याबाहेर पडणार नाहीत.

महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल आठ लोकांसह जेव्हा सावरकरांनाही अटक झाली, तेव्हा त्यांच्या प्रतिमेला सर्वाधिक धक्का पोहोचला. ठोस पुराव्यांच्या अभावे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनीही हीच रणनीती वापरलीये. अगदी पहिला गड घेतल्यापासून ते शेवटपर्यंत एका बाजूला माफी मागून दुसऱ्या बाजूला छत्रपती आपले कार्य करताना दिसतात. शाहजहान, आदिलशाह, अफजलखान, सिद्दी जौहर, मिर्झाराजे, औरंगजेब अशा सगळ्यांचीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी माफी मागितली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपले मनसुबे पार पाडले आहेत. त्यांनाही माफीवीर म्हणणार का मग तुम्ही?? पुरंदरच्या तहाच्या वेळी तर वेळ पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः औरंगजेबाच्या सैन्याचे नेतृत्व केल्याचे जाणकार सांगतात. वेळप्रसंगी नमतं घेऊन, शत्रूला बेसावध ठेवून स्वतःचा कार्यभाग साधून घेण्याचं हेच तंत्र नंतर सावरकरांनी अवलंबलं. पण केवळ असूयेपोटी आणि हाती सत्ता असल्यामुळे ह्या महान स्वातंत्र्यवीराबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या आणि त्यांना बदनाम केलं गेलं या उलट ज्यांची पात्रता नाही अशा लोकांना महत्वाची स्थानं दिली गेली. अजूनही स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कितीतरी लोकांचा इतिहास सर्वसामान्यांपासून लपवण्यात आला आहे.

सांगायचा मुद्दा हा की जर तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईटही बोलू नये कारण तेवढी आपल्या कुणाचीच लायकी नाही.

©प्रतिलिखित

27190cookie-checkस्वातंत्र्यवीर सावरकर

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories