
शहीद
२३ मार्च १९३१,
संध्याकाळची सहाची वेळ. लाहोरच्या तुरुंगात एक तरुण कैदी लेनिनचे चरित्र वाचता वाचता आपल्या मित्राने पाठविलेले रसगुल्ले मजेत खात होता. चेहऱ्यावर कसलाही मागमूस नाही आणि थोड्याच वेळेत आपल्याला फाशी जावे लागणार आहे हे तर त्याच्या गावीही नाही. सगळीकडे अगदी निस्तब्ध वातावरण होते. ती अल्पकाळाची शांततासुद्धा फार अस्वस्थ करणारी होती.
फाशीची वेळ जवळ येत असल्याचे भालेदाराने त्या कैद्याला खुणेनेच सांगितले. वाचनात गढून गेलेल्या त्या कैद्याने ‘जरा थांब’ असे भालेदाराने खुणावले. लेनिनच्या चरित्राचे शेवटचे पान वाचून झाले, मित्राने दिलेला शेवटचा रसगुल्ला तोंडात टाकला आणि तो त्या भालेदारासोबत निघाला.
निघाला…कुठे? फाशीवर जाण्यासाठी? ह्याचा अर्थ तो कुणी चोरी करणारा गुन्हेगार नव्हता, तर तो होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मरण स्वीकारणारा शाहिद आजम भगतसिंग.
भगतसिंग, सुखदेव,राजगुरू ह्या तिघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली, तिघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिघांच्याही नजरा सांगत होत्या इहलोकातील आपली ही शेवटची भेट, यानंतर आपली भेट स्वर्गात.
(इयत्ता पाचवीला केलेलं भाषण, पण अजूनही शब्द न शब्द तसाच्या तसा आठवतोय.)
©प्रतिलिखित
No Comment