
Uncategorized
निसर्ग आणि मानव
पुन्हा एकदा मानवाने
निसर्गाचा रुद्रावतार पाहिला
अण्वस्त्रधारी असूनसुद्धा तो
जीव मुठीत धरून राहिला
झुगारून निसर्गाचे नियम
घेतले त्याच्याशीच वाकडे
स्पर्धा, श्रेष्ठत्व सगळं सोडून
मोजत बसला आकडे
जवळच्याच माणसांवरून
फिरली संशयाची सुई
जिवाच्या आकांताने पळताना
सर्वांनाच थोडी झाली भुई
एकमेकांना साथ देऊन तो
पुन्हा खंबीरपणे उभा राहिला
कदाचित पहिल्यांदाच माणसाने
माणसातला देव पाहिला
No Comment