“No reply…means ?? “

‘अरे यार…किती लेट रिप्लाय करतोय हा मुलगा….अर्ध्या तासापासून ऑनलाइन आहे तरी सुद्धा माझा मेसेज दिसत नाही का याला??? की पाहून न पाहिल्या सारखं करत असेल…मेसेजला blue ticks पण येत नाहीयेत..इतका कोणा बरोबर बोलत असेल?? की आता माझी जागा दुसऱ्या कोणीतरी घेतलीये..त्या व्यक्तीला ताटकळत न ठेवता पटकन रिप्लाय करता यावा म्हणून हा माझे मेसेज बघत नसेल का?? पण इथे माझा संताप होतो त्याच काय??? त्याचं याला काही पडलेलं नाहीये… एक तर हा स्वतःहून कधी जास्ती मेसेज करत नाही आणि मी आधीच सगळं विसरून मेसेज केला तर याचे लेट रिप्लाय…वैताग आलाय मला आता…जाऊ दे…मी आता परत मेसेज करणारच नाही….’

आपल्यापैकी प्रत्येकाने ही द्विधा मनस्थिती  नक्कीच अनुभवली असणार. आपण एखाद्या व्यक्तीला खूप importance देतो तेवढाच त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला द्यावा अशी आपली एक माफक अपेक्षा असते. आणि जर तसं झालं नाही की मग आपला मनस्ताप होतो…आता calling पेक्षा chattingच जास्त प्रमाणात होतं. कॉल वर बोलताना कधी अशी वेळ येत नाही कारण दोघेही फक्त परस्परांशीच बोलत असतात. पण जेव्हा आपण chatting करतो तेव्हा आपण आपली बाकीची सुद्धा कामं करत असतो..

हल्ली तर meetings सुद्धा व्हॅट्स अँप चा ग्रुप बनवून त्यावर होतात. आता ग्रुप म्हटला की वीस तीस मेंबर्स तरी असणार त्यात. आणि सगळे जण एकाच वेळी बोलत असतील तर मेसेज ची ही भली मोठी line लागते..आणि त्यात जर का आपण दुसरी chat window उघडली तर त्या व्यक्तीला रिप्लाय करून पुन्हा ते ग्रुप chat उघडे पर्यंत त्या ग्रुप मध्ये किमान वीस तीस तरी मेसेज आलेले असतात.आणि मग परत ते एवढे मेसेज वाचेपर्यंत अजून मेसेज येतात..

आपण जेव्हा ड्राइविंग करत असतो तेव्हा आपण फक्त आलेले मेसेज चेक करतो. तेव्हा रिप्लाय करणं आपण शक्यतो टाळतो..कारण एकदा रिप्लाय केला आणि मग नंतर मेसेज बघूनसुद्धा रिप्लाय नाही केला को समोरच्याला वाटत हा आपल्याला ignore करतोय.

बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास करत असतो आणि आपल्या एखाद्या मित्राला कोणतं तरी उत्तर हवं असतं.. आता फोटो send करायला तर ऑनलाइन यावच लागणार ना..तेव्हा सुद्धा ऑनलाइन येऊन मेसेज बघितला नाही म्हणून मग पुन्हा चिडचिड..

कधी कधी इंटरनेट सुद्धा आपले रंग दाखवतं. समोरच्याचे मेसेज आपल्याला येतात पण आपले मेसेज काही send होत नाही..मग पुन्हा ऑनलाइन राहून रिप्लाय न केल्याचा ठपका..

काही जण सारखे सारखे ‘हा मेसेज दहा जणांना फॉरवर्ड करा मग हे होईल…’ असेच मेसेज पाठवत असतात. आणि मग अशा माणसाने कधी कामाचा मेसेज केला की मग आपण तसलंच काही तरी सेंड केलं असेल असं समजून ignore करून टाकतो.

अशा या छोट्या छोट्या गोष्टींमुळे अनेकदा दोघांमधले संबंध ताणले जातात..मग ती मैत्री असो वा प्रेम..गैरसमज होतोच होतो..या गैरसमजातून काही तरी टोकाचा विचार कारण्यापेक्षा समोरच्याला जर थोडा वेळ दिला तर कसलाही भडका उडणार नाही..आता तुम्ही समोरच्यावर रागावणार आणि मग तुम्ही त्याची बाजू समजून घेत नाही म्हणून समोरचा तुमच्यावर रागावणार हे असं किती दिवस चालणार ना….मग कधी तरी त्या गोष्टीला पूर्णविराम मिळतोच..फक्त रिप्लाय लेट येतोय म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनातलं आपलं महत्व कमी झालं असं वाटून घेण्यात काय अर्थ आहे..

–        प्रतिक प्रवीण म्हात्रे

3861cookie-check“No reply…means ?? “

Related Posts

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन

ये है मुंबई मेरी जान…

ये है मुंबई मेरी जान…

5 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 286,535 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories