
Uncategorized
काय हरकत आहे??
काय हरकत आहे??
दुसऱ्यांसाठी नेहमीच जगतो आपण
पण कधीतरी इतर सर्व विचार बाजूला सारून
एक दिवस स्वतःसाठी जगायला
काय हरकत आहे??
तशी घरातली कामं ज्याचीत्याची ठरलेली असतात
पण कधीतरी आई,बायकोला कामातून आराम देऊन
आपण त्यांच्यासाठी छान स्वयंपाक करायला
काय हरकत आहे??
सोशल मीडियावर तसा टाईमपास होतो आपला
पण कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून
घरातल्या माणसांशी गप्पा मारायला
काय हरकत आहे??
व्यस्त तर आपण सर्वच आहोत
पण कधीतरी थोडा वेळ काढून
जुन्या मित्राला स्वतःहून फोन करायला
काय हरकत आहे??
धावपळीमुळे जगायचं विसरलोय आपण
यंत्रासारखं आखून दिलेलं काम बाजूला सारून
एक दिवस माणूस म्हणून जगायला
काय हरकत आहे??
©PRATILIKHIT
No Comment