
बलात्कार आणि भारतीय
बलात्कार आणि भारतीय
नुकत्याच घडलेल्या प्रसंगामुळे सगळीकडे असंतोष पसरला आहे. सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. अगदी माझ्याही. मग बराच विचार करून खालील काही मुद्दे आपणासमोर मांडतो आहे.
१. सर्वसामान्यांच्या मनात येणारा पहिला विचार हाच ‘बलात्कार करण्याऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.’ तर भारतात दुर्मिळातल्या दुर्मीळ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा गुन्हा ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा’ म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. मागे मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांनी 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचं विधेयक तयार केलं होतं. पुढे त्याच काय झालं कुणास ठाऊक. अगदी अमेरिकेत सुद्धा २००८ सालापर्यंत बलात्कार करणाऱ्याला फाशी दिली जात असे. पुढे कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली.
२. कायदेतज्ज्ञ असं म्हणतात की जर कोणत्या मुलीवर अतिप्रसंग होत असेल तर तो करणाऱ्यावर स्वसंरक्षणासाठी प्रतिकार किंवा हल्ला हक्क त्या मुलीला आहे. पण जेव्हा एखाद्या मुलीवर असा प्रसंग ओढवतो तेव्हा खरच ती त्या परिस्थितीत प्रतिकार करू शकते का?? त्यातही जर चार पाच जण मिळून तिच्यावर जबरदस्ती करत असतील तर तिचा प्रतिकार किती पुरा पडणार??
३. कायद्यानुसार जर बलात्कार पीडित स्त्रीचा जर मृत्यू झाला नाही तर त्या आरोपीला मृत्युदंड देता येत नाही कारण ती शिक्षा त्याच्या अपराधापेक्षा मोठी ठरले. त्यामुळे बलात्कार करणाऱ्याला काही वर्षे कैद किंवा फार फार तर जन्मठेपेची शिक्षा होते.
ह्या झाल्या काही कायदेशीर बाबी. आता सामाजिक गोष्टी पाहू.
४. जेव्हा एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा केवळ त्या स्त्रीचंच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त होतं. त्या प्रसंगाची झळ सर्वांनाच पोहोचते. त्यामुळे ह्या प्रसंगात पीडित एक व्यक्ती नाही तर तिचं संपूर्ण कुटुंब असते.
५. इतर देशात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी बऱ्याच शिक्षा आहेत. गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्या शिक्षा त्यांना दिल्या जातात. मात्र आपल्याकडे तितक्याशा कठोर शिक्षा नाहीत. गुन्हा सिद्ध झाल्यावर त्या माणसाला कठोर शासन करायला काहीच हरकत नसावी. बलात्कार करताना त्या व्यक्तीला त्या स्त्री बद्दल सहानुभूती वाटली नाही तर त्याने गुन्हा केल्यावर त्याला होणाऱ्या शिक्षेबद्दल इतरांना सहानुभूती का वाटावी???
६. बलात्कार हा गंभीर गुन्हा मानून हे खटले फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवायला हवेत. कारण बऱ्याचदा असं होतं की त्या खटल्याचा निकाल बऱ्याच वर्षांनी लागतो तो पर्यंत आरोपीला सुनावलेली शिक्षेची वर्षे त्याने त्याला शिक्षा सुनावण्याच्या आधीच पूर्ण केलेली असतात आणि मग शिक्षा होऊन सुद्धा ते मोकाट सुटतात.
७. बऱ्याचदा ह्या प्रकरणांमध्ये सरकारला दोषी ठरवलं जातं. पण ह्यात सरकारला दोष दिला म्हणजे आपण सुटलो असं नाहीये. कारण बलात्काराचं मूळ कारण ही राक्षसी वृत्ती आहे. समाजात जशी चांगल्या विचारांची माणसं असतात तशी वाईट विचारांची सुद्धा असतात. ही राक्षसी वृत्ती ठेचायलाच हवी. त्यामुळे बलात्कार होण्यात सरकारचा काही दोष नसला तरी तो बलात्कार करणाऱ्याला शिक्षा करण्यास आपण असमर्थ ठरतो हे मात्र सरकारचंच अपयश आहे.
८. बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्या तर बलात्कार कमी होतील का?? कमी होणार नाहीत पण त्यावर नियंत्रण मात्र नक्कीच बसेल. कारण बलात्कार करणाऱ्या माणसांना सारासार विचार करण्याची बुद्धी असती तर त्याने तसं केलंच नसतं. बलात्कार रोखणं आपल्या हातात नसलं तरी त्याला योग्य त्या वेळी कठोर शासन केलं तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या उक्तीप्रमाणे असं काही करताना माणूस शंभर वेळा विचार करेल हे मात्र नक्की.
९. जो पर्यंत ह्याबाबत कायदा कडक होत नाही आणि गुन्हेगारांना लवकर शिक्षा होत नाही तो पर्यंत ह्यात काहीही बदल होणार नाही. कारण असे लोक नंतर कायद्यातून पळवाटा बरोबर शोधून काढतात.
Make sure you also check our other articles in Marathi.
इतर मराठी लेख
No Comment