
Uncategorized
पुढच्या वर्षी लवकर या
माफ कर बाप्पा मला
ह्या वेळी विसर्जनाला येता नाही आलं
तुझ्या निरोपासाठी जाहले भजन
गाता नाही आलं
का कोण जाणे
पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं
सहकुटुंब तुझी सेवा झाली नाही
म्हणून थोडंस वाईटही वाटलं
आम्हाला अद्दल घडावी
म्हणून तू हे केलंस का
निसर्गाला तुच्छ मानणाऱ्या मानवाला
त्याची मर्यादा दाखवलीय का
तंत्रज्ञानाच्या अभिमानामुळे
आम्ही फार माजलो होतो
ज्याने सजीवसृष्टीला जन्म दिला
त्या नैसर्गिक शक्तीलाच विसरलो होतो
पुढच्या वर्षी लवकर ये
हेच एक मागणं मागतो
तुला अपेक्षित असलेला बदल दिसेल
ह्याची मात्र खात्री देतो
© PRATILIKHIT
गणपती बाप्पा मोरया