लिव्ह इन : बदलणारी विचारधारा

लिव्ह इन : बदलणारी विचारधारा

“राज, आय थिंक इट्स टाईम टु एन्ड एव्हर रिलेशनशिप.”

“का??? काय झालं??”

“इट्स नॉट वर्किंग आऊट…तुला नाही का जाणवत असं काही???”

“नाही…म्हणजे वाद तर होतायेत आपल्यात पण इतकेही नाही की आपण एन्ड करावं..”

“कम ऑन यार…चिल…पुढल्या आठवड्यात निकीच्या फ्लॅट वर जातेय मी….हे घर सोडतेय…”

“अच्छा…म्हणजे तू आधीच सगळं ठरवलंय तर.”

“येस.”

“ठीक आहे. काही बोलायचं शिल्लकच नाही राहत मग.”

किती सहजतेने नातं तोडलं गेलं ना. ना कसली भांडणं, ना कोर्टकचेऱ्यांची लफडी. मनात आलं आणि झालो वेगळं.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’.
ह्या संकल्पनेविषयी नेहमीच आपल्या कानावर काही न काही येत असतं. बऱ्याचशा चित्रपटांमध्येसुद्धा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बद्दल दाखवलं जातं आणि चित्रपटातील काल्पनिक दृश्यांना खरे मानणारे आपल्यासारखे अनेक जण काय बरे असेल ही लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नापेक्षा चांगली संकल्पना असू शकेल का ही? याचा विचार करत राहतात.

‘नात्याला काही नाव नसावे.तू ही रे माझा मितवा.’ किती सहज बोलून जातो ना आपण. मुळात लिव्ह इन बद्दल विचार करताना आपण आपली संस्कृती, आपलं राहण्याचं ठिकाण, आपले विचार ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हेच बघा ना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘कुटुंब’ ही संकल्पना रूढआहे. लग्न, संसार यासारखे विचार आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं स्थान टिकवून आहेत. आपण कितीही पुढारलेले असलो तरी सुद्धा आपण ज्या देशात राहतो तिथले आचार विचार आपल्याला पाळावे लागतात, पाळावे लागतात म्हणण्यापेक्षा आपण स्वखुशीने ते पाळतो. देश तसा वेश हे फक्त बोलायचं म्हणून नाही तर ते आचारणातदेखील आणावं लागतं.

मुळात लिव्ह इन ही संकल्पना पाश्चात्य देशांची. तिकडे कुटुंब ही संकल्पना कुठेतरी हरवली आहे असं वाटतं. स्वावलंबी बनायच्या निमित्ताने सोळा वर्षांपासून मुले आपल्या आई वडिलांपासून दूर होतात. त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना कुटुंब, एकत्र राहणं याबाबत फार ओढ नसावी बहुतेक. एकत्र असताना मने जुळली तर त्या नात्याला लग्नाबेडीत बांधण्यापेक्षा लिव्ह इन मध्ये बांधणे ही त्यांच्या दृष्टीने त्यांना योग्य वाटतं. लग्नबेडीत पडण्याआधी आपल्या जोडीदाराचा स्वभाव, गुण कळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि लग्न झाल्यावर दोघेही सामंजस्याने प्रत्येक गोष्ट करत असतात. थोड्याशा मतभेदांमुळे घटस्फोट वगैरे घेऊन ते नातंच संपवून टाकण्याचं पाऊल शक्यतो कुणी उचलत नाही. या उलट जवळीक वाढली म्हणून एकत्र राहून नंतर मदभेद झाल्यामुळे नातं तोडून टाकण्याचा खुला पर्याय लिव्ह इन मध्ये सहज उपलब्ध असतो. पण परस्परांशी जुळवून घेऊन नात उलगडण्याची मजा आहे ती लिव्ह इन मध्ये कुठेतरी हरवलेली दिसते. जो हक्क आपण आपल्या इतर नात्यांमध्ये सांगू शकतो तो लिव्ह इन मध्ये सांगता येत नाही. बऱ्याचदा त्याची परिणीती नातं संपण्यात होते.

भारतासारख्या कुटुंबप्रधान संस्कृतीचं पालन करणाऱ्या देशात लिव्ह इन यशस्वी होण्याची संभावता थोडी कमीच आहे. कारण आपल्या मनावर अजूनही सांस्कृतिक विचारांचा प्रभाव आहे. हल्लीच्या तरुणाईला जरी लिव्ह इन संकल्पना पटत असली तरी आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करता ती अंमलात आणणं कठीण आहे.आणि मुळात आपल्याकडे हक्काचं नातं जपण्याचा पर्याय असताना कशाला ह्या मृगजळात अडकायचं ना ?

© PRATILIKHIT

13700cookie-checkलिव्ह इन : बदलणारी विचारधारा

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories