Uncategorized
चतुर आणि सुई
बालपणीचे सवंगडी दोन
एक चतुर, दुसरी सुई
त्यांचे तसे खेळताना हालचं
पण आमचं मात्र मनोरंजन होई
कधी मागून जाऊन हलकेच
शेपटी तिची धरायचो
चिमटीत धरून तिला
संपूर्ण गावभर हिंडायचो
कधी बांधून शेपटाला दोर
हेलिकॉप्टर बनवून उडवायचो
कधी दाबून पंख हलकेच
खांद्यावरती मिरवायचो
हिरवा, डांबरी, गेंडा
नावे ती तऱ्हेतऱ्हेची
एकमेकांसोबत झुंज लावण्या
गंमत फार वाटायची
जसजसे मोठे झालो
तशी भूतदया अंगी भिनली
लहान मुलांनी पकडलेली सुई
हलकेच फुलांवर सोडून दिली
©PRATILIKHIT
No Comment