Uncategorized
Happy Brother’s Day
नात्यांमधले नाते हे
पवित्र जसे जल गंगेचे
पुण्य लागते पदरी आपुल्या
लाभण्या नाते भावाबहिणीचे
सान असो वा थोरला तो
शासन चाले बहिणीचे
कधी चुकता बहीण नेमकी
तो प्रसंगी समजही देतसे
सुखदुःख संकट समयी
तीस आधार बहू वाटतो
होऊनी माय बाप तिचा
तो काळजी तिची घेतो
येता वयात लग्नाच्या
ब्याद जाईल म्हणून चिडवी तिजला
मनी प्रसन्नता दुःखही थोडे
होईन पारखा बहिणीला
निघे ती सासरी जेव्हा
अश्रू नयनी सहोदराच्या
दिल्या घरी तू सुखी राहा
एकची आशीर्वाद मुखी तयाच्या
© PRATILIKHIT
No Comment