Uncategorized
Co Corona Go – 2
पाहत होतो मंगळाची स्वप्नं
कुठून आला हा कोरोनाचा विषाणू
श्रेठत्व विसरून सर्व आलेत एकत्र
सावरण्या परिस्थितीचा सुकाणू
नजरेसही न पडता कुणाच्या
केले याने सर्व व्यवहार ठप्प
दिवसरात्र जगबजलेल्या शहरांना
लॉक डाऊन करून ठेवले गप्प
सुट्टी साठी रडणाऱ्यांना याने
सक्तीची रजा देऊन टाकली
स्वतःमधल्या कलागुणांची
जाणीव मात्र करून दिली
मंदिरातला देव लोकांना
हॉस्पिटल आणि रस्त्यावर दिसला
डॉक्टर, नर्स, पोलिसांच्या रुपात येऊन
जनतेची सेवा करत बसला
परिस्थितीचं गांभीर्य
समजावून सांगा लोकांना एकदा
वारंवार घराबाहेर पडणाऱ्यांना
काय सांगशील तू ज्ञानदा
© PRATILIKHIT
No Comment