Uncategorized
वादळे
भिरभिरत होती चहूकडे तू
नजरेतच मी विरलो होतो
तू वळून पाहत नाहीस म्हणून
एका नेत्रकटाक्षासाठी झुरलो होतो
तू कॉलेजला आल्यापासून
प्रत्येक दिवस नवीन वाटायचा
तुला सकाळी पाहिल्यावर
दिवस कसा आनंदी जायचा
वाटायचे सारखे मनाला
येऊन बोलावे तुझ्याशी
खोलवर उठलेल्या वादळाला
घेऊन यावे किनाऱ्यापाशी
वादळे मात्र सारखी यायची
किनारा त्यांनाही मिळायचा
आम्ही हक्क सांगण्याआधी तिला
दुसराच कुणीतरी घेऊन जायचा
पुन्हा वारे वाहण्याची वाट बघण्यातच
आमचा वेळ निघून जायचा
कितीही पाऊस येऊन गेला
तरी आमच्याकडे मात्र दुष्काळच असायचा
© PRATILIKHIT
( वरील कविता पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा .)
No Comment