येता फेब्रुवारी…
येता फेब्रुवारी महिना
सगळ्या प्रेमवीरांची होते दैना
काय गिफ्ट द्यावं बरं सोनूला
विचाराने बिचाऱ्यांना झोपच येईना
पहिल्या दिवशी तर गुलाब देतात
इतर दिवशी त्यालाच पायदळी तुडवतात
गुलाबाच्या बागेतही नसतील
इतकी फुले रस्त्यावर दिसतात
इतर वेळी कच खाणारे
दुसऱ्या दिवशी मात्र भलतीच हिंमत करतात
डर के आगे जित हैं म्हणताच
फटके खाण्याचे चान्स वाढतात
चॉकोलेट आणि टेडी डे ला
सर्वात जास्त दुकानदार खुश असतो
लहान मुलांसाठी आणलेला स्टॉक
मोठ्यांच्या नावावर खपत असतो
नंतरचे तीन दिवस तर
खातेदारांसाठी राखीव असतात
जे रांगेत उभे आहेत
त्यांच्यासाठी मात्र दुष्काळाचे असतात
या वर्षी व्हॅलेंटाईन ला
हे फॅड नक्की येणार
दिपविर, वीरनुष्का सारखी
आणखी बरीच नावे ऐकायला मिळणार
या सगळ्या गडबडीचं मात्र
आम्हा सिंगल लोकांना काही सोयरसुतक नसतं
असो रोझ डे किंवा व्हॅलेन्टाईन
आमचं रोजचंच रुटीन ठरलेलं असतं
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment