नियती….पर्व दुसरे..(भाग १४)

रश्मीला एवढ्या लवकर घरी आलेलं बघून तिच्या आईला जरा आश्चर्यचं वाटलं.

” काय गं…काय झालं ??? बरं वाटत नाहीये का…तरीही मी सांगत होते की आराम कर नाहीतर त्रास होईल पण ती माझं ऐकशील तर शपथ…”

” आई..जरा थंड घेशील का…सांगते तुला सविस्तर..पहिले मला सांग आपली टूरला जायची बॅग कुठे आहे..गेल्या वर्षी तुम्ही हिमाचलला घेऊन गेला होतात ती??”

” ती बॅग ना..असेल वरच्या कट्ट्यावर नाहीतर पलंगामध्ये..पण तुला आता ती कशाला हविये आणि मुळात मी काय विचारलं आणि तू काय सांगतेय…”

” अगं मला केरळला जायचंय….”

” काय..बाबा पाठवणार नाहीत…” रश्मीच्या आईने आधीच सांगून टाकलं..

” अगं कंपनीमधून जातेय..पिकनिकला नाही…”

” म्हणजे…”

” आमच्या कंपनीचं ट्रेनिंग आहे केरळला..तीन महिने..आणि कंपनीने मला पाठवायचं ठरवलंय…”

” असं अचानक…ते सुद्धा तीन महिने….” रश्मीची आई जवळजवळ ओरडलीच..

” अगं..हो हो..जरा शांत…मलासुद्धा ऑफिसला गेल्यावरचं कळलं..म्हणून मग माझा बॉस म्हणाला की लवकर जा म्हणून..उद्या दुपारची फ्लाईट आहे माझी. प्रवास आणि अकोमोडेशन सगळं कंपनीच असणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.”

” पण हे असं अचानक कसं ठरू शकतं.. पहिले बाबांना फोन करुन सांग…मला मात्र हे..”

” आई…आई..बाबांना मी आधीच फोन करून सांगितलं आहे…आता मला आवरायला जरा मदत करशील का….”

” हा..थांब पहिले आपली बॅग कुठे आहे ते शोधते..आणि तुला काय काय हवंय याची एक लिस्ट बनवून दे..आपण डिमार्ट मध्ये जाऊन घेऊन येऊ…”

” अगं आई…फार काही नाही नेत मी इकडून..तिकडे सगळं मिळेलचं… उगाच कशाला इथून वजन घेऊन जायचं.”

” अगं पण तो म्हात्र्यांचा प्रतिक गेला होता ना केरळला..तो म्हणत होता की तिकडे जवळपास काहीचं मिळत नाही म्हणून…”

” अगं त्याचं हॉस्टेल कळकोट्टम की कझाकोट्टम नावाच्या गावात होता..माझं प्रॉपर शहरात आहे..माझं आधीच विचारून झालंय.. सो…डोन्ट वरी…आणि हो…संध्याकाळी अविला भेटायला जायचंय…त्याच्याकडे राज काही documents देणार आहे ..”

“बरं…”

” चल मी आवरायला घेते…तू ती आपली बॅग काढून ठेव..”

——————————————

“अवि…कुठे आहेस…निघालास का ??”

“हॅलो रश्मी…हो निघतोच आहे….पोचेन मी अर्ध्या तासात…”

“ठीक आहे..मी निघते मग आताच..ऑटो मिळायला वेळ लागेल..चलो..सिया…”

” हो…बाय…”

अविनाश आला तेव्हा रश्मी गूगलवर तिचं हॉस्टेल शोधत होती..

” काय मॅडम…झाली का सगळी तयारी…”

आल्या आल्याच अविनाशने रश्मीला विचारलं..

” अरे आधी येऊन बस तरी…काय उभ्या उभ्याच सगळं विचारतोय.”

” बॅग भरून झालीये… बाकी छोटं मोठं सामान आहे ते मी जाताना घेईन आणि मग बाकी राहिलेलं तिकडे घेईन…”

” बरं… ज्या कामासाठी भेटलो आहोत ते काम पहिले करून घेतो म्हणजे नंतर विसरायला नको..हे घे लेटर..आणि बाकी काही कागदपत्रे आहेत…”

” थँक्स…”

” अरे…. बस दुआ मे याद रखना…”

” आता थोडे दिवस तेच करावं लागणार आहे…” रश्मी तोंड पाडून म्हणाली.

” ठीक आहे गं.. जे आहे त्यात समाधान मानायचं आणि जगत राहायचं…”

” अहो महोदय…आपले उच्च विचार ना आपल्यापाशीच ठेवा…सध्या माझी मनस्थिती तरी असं प्रवचन ऐकण्याची नाहीये…तीन महिने अवि…can you imagine… आणि जर माझा परफॉर्मन्स चांगला असला तर मग अजून…”

” म्हणजे तू काय मुद्दामहून खराब परफॉर्मन्स देणार आहेस की काय ???”

” नाही रे…तस नाही..पण एवढे दिवस मी तुझ्या पासून लांब…”

” आपल्याला भेटूनच किती दिवस झालेत रश्मी…उलट या काळात आपल्यालाच काही गोष्टी क्लिअर होतील…आणि विडिओ कॉल करत जाऊ ना आपण रोज…कशाला काळजी करतेस….जातेच आहेस तर आनंदी होऊन जा आणि केरळ फिरून घे मस्त…सगळे विकेंड एन्जॉय कर..अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही..आणि महत्वाचं…काळजी घे स्वतःची…”

” हो…पण मिस करेन यार मी तुला….”

” मला सुद्धा आठवण येईल तुझी…पण ऑपशन नाहीये दुसरा…”

” हो…ते ही आहेच…”

” आणि हो..उद्या मला नाही जमणार तुला एअरपोर्टला सोडायला यायला..माझी मीटिंग आहे एका क्लायंट बरोबर…”

” झालं..बघ…जायच्या आधीच दुरावा…”

” माय डिअर…दुरावा तर अजून यायचा आहे….”

” म्हणजे…???” रश्मीने प्रश्नार्थक नजरेने अविनाशकडे पाहिलं..

” काही नाही.. जाऊदे…”

” चल… निघुया का आत्ता…तुझी अजून बरीच तयारी व्हायची असेल…”

” निघायचं..???” रश्मी पुन्हा चेहरा पाडून म्हणाली.
रश्मीला असं उदास बघून अविनाशलासुद्धा थोडं वाईट वाटलं पण तो नेहमी त्याच्या प्रोफेशनला, त्याच्या कामाला त्याच्या भविष्याला प्रथम प्राधान्य द्यायचा आणि जो स्वतःच्या भविष्याचा एवढा विचार करतो तो रश्मीच्या बाबतीत स्वार्थी होऊ शकत नव्हता त्यामुळेच रश्मीने तिला मिळालेली संधी स्वीकारावी आणि त्या संधीचं सोनं करावं असं त्याला अगदी मनापासून वाटत होतं. त्यामुळे त्याला कितीही वाईट वाटत असलं तरी त्याला ते रश्मीला दाखवायचं नव्हतं.

रश्मीला अजून थोडी खरेदी करायची असल्यामुळे अविनाशने तिला मार्केटमध्ये सोडलं.खरंतर दोघांनाही एकमेकांचा निरोप घेताना अगदी जीवावर आलं होतं मग शेवटी इथेही अविनाशने पुढाकार घेतला.

” चला मॅडम..निघतो आम्ही..काळजी घ्या…नीट राहा..आणि पोचल्यावर मेसेज करा…हॅपी जर्नी…”

रश्मीने एकदम अविनाशला मिठी मारली..क्षणभर अविनाशला वाटलं की हा क्षण संपूच नये..पण मग त्याने स्वतःला सावरून रश्मीची पाठ थोपटली आणि मग पुन्हा मागे वळून न बघता तो बाईक पळवत दिसेनासा झाला..

क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6340cookie-checkनियती….पर्व दुसरे..(भाग १४)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 114,924 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories