आणखी एक निर्भया….👧

काश्मीर खोऱ्यातील कठूआ जिल्ह्यातील आठ वर्षीय चिमुकलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या. संपूर्ण देशातील सुजाण जनतेने या घटनेचा निषेध केला. अर्थात त्या घटनेबद्दल मी फार सविस्तर बोलणार नाही कारण पेपर मधून आणि बातम्यांमधून तुम्ही ते पाहिलंच असेल. पण या घटनेमधून महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

अशी एखादी घटना अचानक आपल्या समोर आली तर आपण खडबडून जागे होतो. लगेच व्हॅट्स अँप , फेसबुक वर स्टेटस टाकून आपण आपला निषेध, आपला राग व्यक्त करतो. पण त्या नंतर काही दिवसांनी परिस्थिती मात्र जैसे थे…निषेध करण्यासाठी आणि त्याविरुद्ध ठोस पावले उचलण्यासाठी आपण काय नेहमी अशी एखादी घटना उजेडात येण्याची वाट पाहत बसायचं का…जी घटना आपल्या डोळ्यासमोर असते ती आपण डोक्यावर उचलून धरतो. अशा असंख्य घटना रोज घडत असतात पण आपल्याला मात्र त्याची अजिबात कल्पना नसते.

आसिफाची हत्या झाली आणि त्या घटनेवरून सुद्धा राजकारण सुरू झालं. एकीकडे या घटनेच्या विरोधात निदर्शने होत आहेत तर दुसरीकडे आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर उतरत आहेत. अशा लोकांच्या चुकीच्या वागण्याला समर्थन मिळालं तर त्यांना कायद्याची भीती वाटेल का ?? एकीकडे आपणच आपल्या आवडत्या व्यक्तीला कायद्याच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी सपोर्ट करतो. हा असा सपोर्ट करून आपणंच चुकीचा पायंडा पाडत नाही का ?? चुकीला शिक्षा झालीच पाहिजे हा न्याय सर्वांसाठी समान ठेवला तर कोणतीही व्यक्ती गुन्हा करायच्या आधी शंभरदा तरी विचार करेल. पण आपल्या इथे न्याय सुद्धा पैशाने विकत घेता येतो तर मग ही परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही.

आसिफाच्या गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. पण या घटनेवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रिया मात्र खटकण्यासारख्या होत्या…त्यातलीच ही एक …

‘ I am terrified to be a part of this country. A country where something as inhumane and disgusting as rape is being justified in the name of religions.’

भारत देशाला राहण्यास अयोग्य ठरवून तुम्ही या देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण देणाऱ्या जवानांचा, त्यांच्या त्यागाचा अवमान करताय. मुळात कोणत्याही देशाची प्रगती किंवा अधोगती ही त्या देशाच्या नागरिकांवर अवलंबून असते. तुम्ही अशा घटना थांबवण्यासाठी काय केलं ?? नुसतं व्हॅट्स अँप वर स्टेटस टाकून, DP ठेवून, मोर्चे काढून या सर्व घटनांना कधीच आळा बसणार नाही..त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवीत. दर वेळी पोलीस आणि सैनिकांवर अवलंबून राहून आणि नंतर त्यांना दोष देण्याने काहीही होणार नाही. ते त्यांचं काम करतच आहेत आपण त्यांना या कामात मदत केली आणि जर आजूबाजूला घडणाऱ्या घटनेकडे लक्ष दिलं तर या अशा घटना नक्कीच कमी होतील.मी माझ्या मागील लेखात सांगितलंच आहे की जो पर्यंत आपण ‘ जाऊ दे ना..आपल्याला काय करायचं…’ असा स्वतःपुरताच विचार करणार तो पर्यंत या गोष्टींमध्ये काहीही बदल होणार नाही.

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5980cookie-checkआणखी एक निर्भया….👧

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories