नियती…..( भाग ७)

दुपारी लंच नंतर रश्मी आणि अविनाश संपूर्ण तयारीनिशी क्लायंट कडे गेले. त्यांनी दोन तीन पार्टी लॉन चे फोटो वगैरे त्यांना दाखवले.. क्लायंटला सुद्धा ते थोडं वेगळं वाटलं कारण या आधीचे सगळे इव्हेंट्स त्यांनी कोणत्या ना कोणत्या हॉल मध्येच केले होते. आणि हा इव्हेंट संध्याकाळचा असल्यामुळे उन्हाचा वगैरेपण प्रश्न नव्हता..शिवाय काहीतरी वेगळं करतोय त्यामुळे employee पण खुश होतील असा सगळा विचार करून क्लायंटने त्या प्रोपोजलला होकार दिला..

” झालं…एक महत्त्वाचं काम झालं…किती हलकं वाटतंय माहितीये…”
“मी म्हणाले होते ना तुला…तूच उगाच टेन्शन घेत होतास..शांत डोक्याने काम केलं तर सगळी काम होतात. आता हे लॉनचं पण तुलाच सुचलं ना….”
” हो…..पण…”
” राहूदे….माहितीये मला तू काय बोलणार आहेस ते….”
” हाहा…” अविनाश खळखळून हसला. ” बरं. आता लवकरात लवकर लॉनचं बुकिंग करून टाकू…म्हणजे नंतर काय सिन व्ह्यायला नको…”
” हो…..पण जरा काही खाशील की नाही….लंच ची वेळ झालीये…काही तरी खाऊया आधी..”
” चालतय की…”
” अरे देवा…तुझ्यात पण राणा आला की काय…”
” नाही नाही….मी आपलं सहजच बोललो..चल जाऊ…ते बघ समोर मॅक डी दिसतंय…माझं दुसरं घर…”
” अरे बाबा…एवढं पिझ्झा बर्गर खायचं नाही….हेल्थ साठी चांगलं नसतं ते…आणि त्यात तू जिमला पण जातोस…”
” मी वजन वाढवतोय…माझ्यासाठी चांगलंय ते…”
” तुझ्याशी बोलण्यात कधी जिंकली आहे का मी…तुझंच खरं करणार तू…खा बाबा काय खायचं ते….”

” इथून आपण परत ऑफिसला जायचंय?? ” अविनाशने बर्गरचा घास घेता घेता विचारलं..
” उममम…काय माहीत..नाही गेलं तरी चालेल ना तस….कारण आपलं आजचं काम तर झालंय…आता फक्त आपल्याला प्लॅंनिंग करायचंय…”
” हा…राजला विचारू का कॉल करून…”
“अरे…राज नाही आहे ना…विसरलास का???”
” अरे हो….मग नको जाऊया ऑफिसला…..”
” चालेल…पण मला एवढ्या लवकर घरी सुद्धा नाही जायचं हा…नाही तर बोअर होईन मी घरी…”
” मग कुठे जायचंय राणीसाहेबांना…” अविनाशने हसतच विचारलं..
” मला काय माहीत…ते डिपार्टमेंट माझ्या कडे कधीच नसत…नेहमी माझे फ्रेंड्स च ठरवतात..कुठे जायचं ते…”
” बरं… मग मूवी ला जाऊया…”
” एक था टायगर आहे….आणि जुमानजी….बघितले मी दोन्ही…”
” च्या आयला…म्हणजे हा मेन ऑपशन नाहीये…”
” तूच सांग मग..फिरायला जायचं का कुठे…”
” hmmmm.. sounds good…”
” मग आता कुठे ते तरी सांग….”
” मरीन्स ला जाऊया…..”
” ते पण माझं दुसरं घर आहे…मरीन्सला जायला मी कधीपण रेडी असतो…”
” ओह…मस्तय रे ती जागा….फक्त ऊन असलं की जरा कंटाळा येतो…रात्रीचा view तर बाप….”
” I know….” अविनाश बाईक स्टार्ट करत म्हणाला….
” निघुया….”
” हो…” असं म्हणत नेहमी दोन्ही पाय एका साईडने टाकून बसणारी रश्मी या वेळी मात्र जसे आपण आपल्या जवळच्या मित्राच्या बाईकवर बसतो तशी बसली…
ती बसली तसा अविनाश दोन क्षण तिच्याकडे पाहतच राहिला..
” काय झालं…” रश्मीने विचारलं..
” काही नाही…” स्वतःशीच हसत अविनाशने गियर टाकला..

दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर फारसं ट्रॅफिक नव्हतं. साधारण अर्ध्या पाऊण तासात ते मरिन ड्राईव्ह ला पोचले. ते पोहोचले आणि त्यांच्यावर जणू वरुणदेवाची कृपाच झाली..एक भला मोठा ढग आला आणि त्याने आग ओकणार्या सूर्याला पूर्णपणे झाकून टाकलं..काही क्षण आधी रणरणत ऊन पडलं होतं आणि आता लगेच संध्याकाळ झाल्याचा फील येत होता. अविनाश रस्त्याच्या कडेला बाईक पार्क करत होता तो पर्यंत रश्मी मरीनलाईनचा कट्टा चढून बसली सुद्धा….मग अविनाशसुद्धा तिच्या बाजूला जाऊन बसला…

” किती छान वारा सुटलाय ना…कोणी सांगेल तरी का की दहा मिनिटं आधी इतकं कडक ऊन पडलं होतं असं…”
” मुंबईतला पाऊस आहे रश्मी हा….कधी येईल कधी जाईल काही नेम नाही….”
” हो…ते आहेच…तुला आवडतो का पाऊस….”
” ते depend करतं की मी तेव्हा काय करतोय…म्हणजे मी घरी असेन ना..तर मग मला पाऊस आवडतो…बाहेर असेल तेव्हा नाही…” अविनाश हसत म्हणाला.
“म्हणजे..???” रश्मीने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
” म्हणजे मला पाऊस फक्त बघायला आवडतो….मस्त गरमागरम कॉफी, आईच्या हातची कांदाभजी आणि पाऊस…हे सगळं असलं म्हणजे जन्नत…पण जर हा मला भिजवायला आला तर मग मला वैताग येतो..”
” अरे रे….तुझ्या सारख्या पामराला काय माहीत पावसात भिजण्याची मजा…..एकदा भिजून बघ….स्वर्गीय सुख मिळाल्यासारखा आनंद होईल तुला…”
” नको…राहू दे…तसही पावसाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो..जर कपल असेल त्यांना पाऊस हा फक्त भिजण्यासाठी हवा असतो, लेखक कवी असेल तर त्यांना काहिनाकाही लिहायला सुचतं…चाकरमानी असेल तर त्याला त्याचा नेहमी रागच येतो….”

बराच वेळ दोघे बोलत बसले होते..बघता बघता सहा कधी वाजले त्यांना कळलंच नाही. ते निघणार तेवढ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली..
” अवि….आज पावसाने तुला स्वर्गीय सुख द्यायचं ठरवलं वाटतं…” रश्मी बाईकवर बसत म्हणाली..
” वाटतंय खरं…. देव पण मुलींचं ऐकायला लागला वाटतं…मी घरी पोचेपर्यंत जास्त जोरात नाही आला म्हणजे झालं…”

मनोमन प्रार्थना करत अविनाश चालला होता खरा पण वरूणराजाची मर्जी काही औरच होती…ते दोघे रश्मीच्या घरी पोचले तेव्हा पावसाने चांगलाच जोर पकडला होता..

क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5620cookie-checkनियती…..( भाग ७)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories