​नियती……(भाग २)

रात्री जेवून बिछान्यावर पडल्यावर रश्मीच्या मनात सहजच त्या बाईकवाल्याचा विचार आला. एक मुलगा सकाळी अचानक भेटतो, त्याच्याशी भांडण होतं, योगायोगाने त्यालासुद्धा आपल्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो, आणि एवढं भांडूनसुद्धा आपण त्याच्याच बाईकवर बसून घरी येतो..हे सगळं एवढं अचानक आणि अनपेक्षित होतं की तिचं तिलाच कळलं नव्हतं की नक्की काय रिऍक्ट करावं. पण उद्या ऑफिसमध्ये कोणतरी आपल्या ओळखीचं असेल या विचारानेच तिला जरा हायसं वाटत होतं.

एरवी अलार्म पाच वेळा तरी snooze करणारी ती त्या दिवशी मात्र पहिल्याच अलार्ममध्ये उठून बसली..नवीन जॉब त् या मुळे थोडी एक्ससाईटमेंट होतीच..सगळं पटापट आवरून आईने दिलेलं दहीसाखर खाऊन ती बाहेर पडली..पावसाची रिपरिप चालू होतीच..दूरदर्शनवर ट्रेन्स उशिरा असल्याच्या बातम्यांसुद्धा येत होत्या…पण नवीन जॉबचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून ती छत्री उघडून साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत चालू लागली.

दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने मुंबईची लाईफलाईन मंदपणे धावत होती. तिला ऑफिसमध्ये पोहोचायला थोडा उशीरच झाला..पहिल्याच दिवशी उशीर झाल्याने तिच्या मनात जरा धाकधुक होती..पण जेव्हा ती ऑफिस मध्ये पोहोचली तेव्हा ऑफिसमध्ये फक्त जवळ राहणारे एक दोन जण आले होते.रोजचं कॉफीचं टाइम झाल्यामुळे आणि त्यातच भर पावसात भिजल्यामुळे तिला कॉफीची तलफ लागली होती त्यामुळे त्यातल्याच एकाला कॉफी मशीन कुठे आहे हे विचारून ती कॉफी प्यायला  गेली. 

कॉफी पितापिता तिची नजर नकळत त्या बाईकवाल्याला शोधू लागली..अनोळखी जागी जर ओळखीचं कोणीतरी असलं तर कोणालाही comfortable वाटेलचं ना…पण त्याचा काही पत्ताच नव्हता…आज त्याचा पण पहिलाच दिवस….आणि त्यात तो बाईकने येतो…रस्त्यावर पाणी साचलं असेल..कसा येणार तो….क्षणात कितीतरी विचार तिच्या मनात येऊन गेले. पण लगेच तिच्या मनात डेव्हिल डोकावला..’आपण का त्याचा एवढा विचार करतोय…एक दिवस तर झालाय भेटून…अजून मला त्याचं नाव सुद्धा नाही माहीत आणि त्याची एवढी काळजी का वाटतेय मला…..’  ती त्याचा विचार मनातून काढून टाकणार तेवढ्यात दरवाजा उघडून तो बाईकवाला मुलगा आत आला….

दोघांची नजरानजर झाली….तिला पाहताच त्याने एक छोटीशी स्माईल दिली आणि नकळतचं तिच्या ओठांवर हास्य उमटलं.. 
क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5400cookie-check​नियती……(भाग २)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

4 Comments

  1. Story खुप छान आहे..👌👌। पुढच्या पर्वातील story वाचण्यास मी उत्सुक आहे….😇

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories