Submissions…

Submissions…

925111714s

Semester संपायला आलं कि
चाहूल लागते ती सबमिशन ची
सबमिशन म्हणजे engineer च्या आयुष्यातल्या कठीण काळांपैकी एक
Multi tasking ची सवय लावणारा
आणि management skills शिकवणारा

कितीही मोठी फाईल असली
तरी ती एका रात्रीत complete करण्याचं
कसब engineer ला आत्मसात असतं
म्हणूनच कि काय
या सबमिशन चं आम्हाला
पूर्ण semester तरी काही टेन्शन नसतं

एरवी मुलींसमोर मोठा attitude मारणारे आम्ही
Submisson च्या वेळी मात्र
त्यांनाच complete करून देण्याची गळ घालत असतो
एक assignment एक chocolate
हा सर्वमान्य दर असतो

इतर दिवशी कधीही lectures न बसणारे
सबमिशन च्या वेळी मात्र
Lecturers च्या मागे मागे फिरत असतात
यातच कधी कोणाची फाईल हरवते
तर कोणाची चोरीला जाते

Copy, paste….
आणि जे समजणार नाही त्याची
आहे तशी design हा
File complete करायचा मंत्र असतो

शेवटी थोडीफार मेहेनत घेऊन
सगळ्या फाइल्स complete केल्या जातात
practical exam झाल्यानंतर मात्र
एवढी मेहेनत करून लिहिलेल्या फाइल्स
४ ते ५ रुपये प्रति किलो दरानेच विकल्या जातात..

_                    प्रतिक प्रवीण म्हात्रे

1660cookie-checkSubmissions…

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

3 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 123,029 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories