Uncategorized
काहीतरी राहून गेलयं…..
काहीतरी राहून गेलयं…..
बालपण जगलो,सर्वांकडून लाड करून घेतले
कौतुक ऐकले,प्रसंगी ओरडाही खाल्ला
अधिकार गाजवला,हट्ट केला
पण तरीही वाटतयं, काहीतरी राहून गेलयं…
मैत्री मिळाली,प्रेम मिळालं
आयुष्यभरासाठी मित्र मिळाले
चिडवचिडवी केली,मारामाऱ्या केल्या
मित्रांचे डब्बे चोरून खाल्ले
इतर वर्गांशी स्पर्धा केली
पण तरीही वाटतयं, काहीतरी राहून गेलयं…
Hangouts केल्या,बंक मारल्या
राडा लफडी केली, proxies मारल्या
Settings लावल्या, ट्रेक्स केले
IV च्या नावाखाली picnics केल्या
अभ्यासाच्या नावाखाली nightouts मारल्या
कॉलेज लाईफ enjoy केली
पण तरीही वाटतयं, काहीतरी राहून गेलयं…
_ प्रतिक प्रवीण म्हात्रे
Nice .. Keep it up. 😘