मला अॅक्टिंग करायचीय!!!

सैराट सिनेमा आला आणि सर्व होतकरू तरुण तरुणींना सिनेमात काम करावं असं वाटू लागलं. ग्लॅमर प्राप्त करायचा एक सहज सोपा फंडा(असं त्यांचं मत). ज्यांनी कधी स्टेजवर पायही ठेवला नाही अशा लोकांनीही दिग्दर्शकाला पत्र लिहिली.
अगदी छोटासा रोल का होईना सिनेमात काम तर करायला मिळेल या वेडी आशा मनात बाळगून केलेली निरर्थक धडपड पाहून खरचं त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटली.
आपल्यातला मुलगा हिरो झालाय म्हणून कदाचित प्रत्येकाला स्वतः मध्ये हिरो दिसू लागलाय.’अरे हा हिरो होऊ शकतो मग आपण का नाही?’असा विचार एकदा मनात आला कि मग पुढची धडपड सुरु..पण आपण ज्या क्षेत्रात आहोत,ज्याची आपल्याला आवड आहे त्याचा विचार न करता जे आहे ते सोडून पळत्याच्या मागे लागण्यात कितपत शहाणपण आहे??
एक दोन एकांकिका,काही नाटकं केली कि यांना वाटतं कि आता आपण अॅक्टर झालो.आता आपल्याला अॅक्टिंग मधलं सगळं कळतं. कलाक्षेत्र म्हणजे ग्लॅमर एवढंच दिसतं लोकांना पण त्यामागे प्रचंड मेहेनत आहे,एक तपश्चर्या आहे.आज जे लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री दिसतात त्यांनी खूप धडपड केलीय. या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी खूप काम केलंय. अचानक ते सुपरस्टार झाले नाहीत.
हाती घेतलेल्या क्षेत्रात काम करण्याचा कंटाळा आला म्हणून अनेक जण चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याचा विचार करतात पण ते क्षेत्र सर्वांना भाग्यदायी ठरेल असं नाहि ना…
फक्त प्रसिद्धी,पैसा मिळतो म्हणून चित्रपटात काम करण्याचा विचार करणं कितपत योग्य आहे. अशाने आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. त्यामुळे फक्त ग्लॅमर कडे न बघता आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणं कधीही चांगलं…

–                                           प्रतिक प्रवीण म्हात्रे

1130cookie-checkमला अॅक्टिंग करायचीय!!!

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories