Uncategorized
आयुष्य असंच जगायचं असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
आकाशात झेपावूनही जमिनीला विसरायचं नसतं,
संकटांना हसत हसत सामोरं जायचं असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
दुःखात कधी रडत बसायचं नसतं
मलाच का निवडलं म्हणून नशिबाला दोष द्यायचा नसतो
आयुष्य असंच जगायचं असतं
सर्व गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं
मार्ग नसेल तर आपण स्वतः बनवायचा असतो
आयुष्य असंच जगायचं असतं
जो पर्यंत स्वप्नपूर्ती होत नाही ,प्रयत्न सोडायचा नसतो
लोकांचा विचार न करता
आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच करायचं असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले
तरी त्यातून सावरून जिद्दीने पुन्हा उभं राहायच असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
_ प्रतिक प्रवीण म्हात्रे
Nice one bro
Nyc 1 Pratil mei teree fan hui ree
Chhan ch…
Ek no kavita bhaava ..keep it up..!!!