Friend’s circle
सगळ्यांना नेहमीचं वाटत असतं
आपलंही एक friend’s circle असावं
कारण नसतांना पार्टी करणारं
नेहमीच hangouts चा प्लॅन बनवणारं
मित्रांच्या जीवावर बिनधास्त असणारं
आपपसातले problems शेअर करणारं
कोणी जर चुकत असेल तर त्याला वेळीच सावध करणारं
प्रसंगी थोडंस strict होऊन त्याला समज देणारं
जीवनाच्या मार्गावर जर
कोणाचा पाय घसरत असेल तर
त्याला लगेच हात देऊन सावरणारं
मित्राच्या girlfriend ला गमतीने वहिनी म्हणणारं
मैत्रिणीच्या boyfriend ला आदराने जिजू म्हणणारं
थट्टा करणाऱ्यास नेहमीच तयार असलेलं
पण जर कोणी जास्त त्रास दिला
तर लगेच मित्राच्या बाजूने उभं राहणारं
कितीही भांडणं झालं तरी
त्या भांडणातही मैत्री जपणारं
आपपसातले मतभेद विसरून
नेहमी एकत्र राहणारं
मैत्रीचं नात आयुष्यभर जपणारं
मित्राच्या दुःखात सुद्धा सहभागी असणारं
मित्राला कधीही एकटं न सोडणारं
संकटात नेहमीच आधार असणारं
एकमेकांपासून कितीही लांब असलो
तरी नेहमीचं आठवणीत राहणारं
जर भेटता येत नसेल
तर फक्त भेटण्यासाठी plan बनविणारं
आपलंही एक friend’s circle असावं
सर्वांना नेहमीच हेवा वाटणारं
_ प्रतीक प्रवीण म्हात्रे
Sundar👌
Khup chan
Malahi vatate mazahi as ek friend circle asav…
8879810035
Chaan….. exactly said..with complete emotions ☺️
Thanks sonal 🙂
Mast lihlys 👌
Thanks 🤗
Ekdam mast😊👌