कविता

लिहिणारच आहेस
तर लिही अशी एक कविता…..

वाचताक्षणी समोरच्याच्या डोळ्यात
ते दृश्य उभं राहायला हवं
कवितेतली प्रत्येक ओळ
त्याला आपलीशी वाटायला हवी

तो शोधत असलेल्या प्रश्नांची उत्तरं
त्याला कवितेत मिळायला हवी
आपल्या कवितेने समोरच्याला एक प्रेरणा द्यायला हवी

त्यांचं दुःख विसरण्यासाठी
त्याला एक कारण मिळायला हवं
कविता वाचताक्षणी त्याने
त्या आठवणींमध्ये हरवायला हवं

जे बोलून व्यक्त करता येत नाही
ते त्याने कवितेतून सांगायला हवं
सर्व काही सरळपणे सांगता आलं असतं
तर शब्दांची किंमत ती काय उरली असती

_                      प्रतिक प्रवीण म्हात्रे

610cookie-checkकविता

Related Posts

सण आणि सुट्टी….

सण आणि सुट्टी….

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

8 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 288,314 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories