ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review #bramhastramovie

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पौराणिक अस्त्रांचा उल्लेख चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केलेला आहे म्हणजे चित्रपटात आपल्याला त्या अस्त्रांबद्दल अधिक काही दाखवलं जाईल असा विचार करून जर तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर पुन्हा एकदा विचार करा कारण तुमची घोर निराशा होऊ शकते.

कारण अस्त्रांवर फार काम केलेलं दिसत नाही. एखाद्या सर्वसामान्य बॉलिवूड चित्रपटासारखीच प्रेमकथा ह्याची चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटाच्या VFXवर बऱ्यापैकी काम करण्यात आलेलं असलं तरीही बॉलिवूडमध्येच आधी आलेल्या शाहरुखच्या रा.वन मधल्या VFX पाहता ते कुठेतरी कमी भासते. पण लहान मुलांना VFX नक्कीच आवडेल.

पण जर तुम्हाला VFX पेक्षा अभिनय पाहायची जास्त आवड असेल तर तुमची पुन्हा एकदा निराशा होऊ शकते. कारण चित्रपटात शाहरुख वगळता इतर कुणाचाही अभिनय इतका उठून दिसत नाही. नागार्जुनसारखा तगडा अभिनेता असूनही त्याच्या पात्राला न्याय मिळत नाहीये. इतरांच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा बऱ्याच वेळा सारखेच आहेत.

अस्त्रांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर यात वानरास्त्र, अग्निअस्त्र, पवनास्त्र आणि नाग अस्त्रची शक्ती थोड्याफार प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. नंदी अस्त्रामध्ये सहस्त्र नंदींची शक्ती असल्याचं सांगूनसुद्धा एक सिन वगळता इतर कुठेही ती शक्ती योग्य रित्या दाखवलेली नाहीये. बाकी वरुणास्त्र, प्रभास्त्र सारख्यांच्या फारसा उपयोग केलेला दिसत नाही. अस्त्रे अजून जास्त चांगल्या प्रकारे दाखवता आली असती पण चित्रपटाचा फोकस अस्त्रे नसून प्रेमकथा असल्याने अस्त्रे कुठेतरी मागे पडली.

सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे ब्रम्हास्त्राची शक्ती ही महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याइतकी आहे असं सांगूनसुद्धा चित्रपटाच्या शेवटी मात्र ब्रम्हास्त्राच्या शक्तीपुढे प्रेमाची ताकद कशी मोठी ठरते हेच दाखवलेलं आहे. इथे जर आपण पुराणाच्या गोष्टीचा संदर्भ घेतला तर भगवान शंकराची तपश्चर्या भंग करणाऱ्यासाठी आलेले आणि प्रेमाची देवता असलेले कामदेव सुद्धा महादेवाच्या तिच्या डोळ्याच्या शक्तीने जळून खाक झाले होते तर तिथे प्रेमाची काय कथा.

एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यात काहीच प्रॉब्लेम नाही कारण VFXची मजा नंतर टीव्ही, लॅपटॉपवर येणार नाही पण जर तुम्ही नाहीच पहिला तर तुम्ही काहीतरी मोठं मिस करताय अशातलाही काही भाग नाही.

ब्रह्मस्त्र…. #review #bramhastramovie

36466cookie-checkब्रह्मस्त्र…. #review

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories