
Uncategorized
माझिया मना
कंटाळला असशील ना तू ही
त्याच त्याच बुरसटलेल्या विचारांनी
बाहेर पडावंसं वाटत असेल
पण हार मानलीये पंखांनी
सोड पिंजरा नकारात्मकतेचा
अन घे झेप तू आकाशी
सोड सगळी भीती
अन कर स्पर्धा वाऱ्याशी
टपले असतील शिकारी
तुला पुन्हा डांबण्यासाठी
घे उंच भरारी तू
कधी न परतून येण्यासाठी
झुगारून दे बंधने सारी
अन कर मुक्त संचार
घालायचीये गवसणी गगनाला
फक्त इतकाच असुदे विचार
©प्रतिलिखित
अतिशय सुंदर रचना 🌿
Thank you 🙌🏻