सोन्याचं अंड देणारी कोंबडी (बाबा का ढाबा)

सोन्याचं अंड देणारी कोंबडी (बाबा का ढाबा)

बाबा का ढाबा

सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. एक एक सोन्याचं अंड मिळत असताना सगळी अंडी एकदाच मिळवण्याच्या हेतूने त्या माणसाने कोंबडीचं पोट फाडलं आणि नंतर त्याला पश्चाताप करावा लागला.

कलियुगात ही गोष्ट सत्यात उतरली आहे. एका युट्यूब व्हिडिओ मुळे प्रसिद्ध झालेल्या ‘बाबा का ढाबा’ ह्या एका वृद्ध व्यक्तीच्या ढाब्याला आपण सगळ्यांनी डोक्यावर उचलून धरलं. व्हिडिओ वायरल झाल्यावर त्या धाब्यावर अक्षरशः ग्राहकांची रांग लागली. कदाचित आजूबाजूचे धाबे ओस पडले असतील इतकी गर्दी इथे झाली. विविध कंपन्या आपली जाहिरात करण्यासाठी ‘बाबा का ढाबा’ वर पोहोचल्या. आणि काही दिवसातच ढाबा फेमस झाला, इतका फेमस झाला की बाबाने नवीन मॅनेजर सुद्धा अपॉइंट केला.

पण जेव्हा आपण प्रसिद्ध होतो तेव्हा वरून आपले हितचिंतक भासणारे हितशत्रूसुद्धा आपल्याकडे येतातच. असेच काही हितशत्रू बाबाकडे आले आणि त्यांनी बाबाचे कान भरले. प्रसिद्धी मिळालेला बाबा राणू मंडल प्रमाणेच उद्दाम होऊन उपकारकर्त्याला विसरला आणि ज्याने त्या बाबाला मदत केली, प्रसिद्ध केले त्याच युट्युबर वर त्याने फसवणुकीचा आरोप केला.

बाबाच्या म्हणण्यानुसार युट्युबरच्या अकाउंटला साधारण वीस लाख रुपये देशभरातून आले पण त्यातले केवळ दोन लाख तेहतीस हजार रुपये बाबाला मिळाले. युट्युबरचं म्हणणं असं की त्याने जे पैसे मिळाले ते सगळे पैसे बाबाला दिले. त्याने मीडियासमोर बँक अकाउंट स्टेटमेंट सुद्धा सादर केलेलं आहे तसेच व्हिडिओ वायरल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी लोकांनी येऊन साधारण पंचाहत्तर हजार रुपये कॅश बाबाला दिली आणि युट्युबर ते पैसे बाबाच्या अकाउंटला टाकण्यासाठी बाबाला घेऊन बँकेत गेला असता बँकेने असं सांगितलं की चोवीस तासांच्या आत खूप जास्त प्रमाणात पैसे बाबाच्या अकाउंटला आल्यामुळे बाबाचं अकाउंट सिज करण्यात आलेलं आहे.

दुसऱ्या कुणाच्यातरी सांगण्यावरून मदत करणाऱ्याला न विचारता थेट त्याच्यावर आरोप करून मोकळं होण्याआधी बाबाने एकदा विचार नक्कीच करायला हवा होता. बरं तो व्हिडिओ वायरल होईलच असं अजिबात नव्हतं. अचानक तो वायरल झाला आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. त्या व्हिडिओ च्या युट्युब,इन्स्टाग्राम वरच्या views चा फायदा त्या युट्युबरला नक्कीच झाला असेल, त्याचे त्याला डॉलर्स मध्ये पैसेही मिळाले असतील पण ते पैसे बाबाला न देऊन त्याने फसवणूक केली असा त्याचा अर्थ होत नाही ना.

दोघेही आपली बाजू मांडत आहेत पण ह्या घटनेमुळे पुढे इतर गरजू लोकांना मदत करताना कुणीही निदान शंभर वेळा तरी विचार करेल हे नक्की.

© PRATILIKHIT

Make sure you also check our other articles in Marathi.
इतर मराठी लेख

17163cookie-checkसोन्याचं अंड देणारी कोंबडी (बाबा का ढाबा)

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,029 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories