
Uncategorized
लोकमान्य टिळक
तेवीस जुलैला रत्नागिरीत
एक लखलखीत रत्न जन्मले
केशव नाव मागे पडून
पुढे बाळ नाव रूढ झाले
भरकटलेल्या तरुणांना तुम्ही
लावली गोडी व्यायामाची
केसरी मराठा वृत्तपत्रांतून
ज्योत पेटवली देशभक्तीची
खाल्ल्या नाही शेंगा तुम्ही
म्हणून टरफलेही उचलली नाही
सामान्यांवर झालेला अन्याय
कधी सहनही केला नाही
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क
आणि तो मी मिळवणारच बाणा तुमचा
पूर्ण केला कारागृहात गीतारहस्य
इतका अभ्यास गाढा तुमचा
सुरू केलीत शिवजयंती
स्थापले डेक्कन एज्युकेशन अन फर्ग्युसन
हुंडा, विधवा वपन बंद करून
विघ्नहर्त्यालाही दिले आसन
© PRATILIKHIT
लोकमान्य टिळक यांना शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🏻💐
No Comment