समर्पण

एवढं सोपं असतं का हो
स्वतःला संपवणं
जे मिळवण्यासाठी आयुष्य झिजवलं
ते क्षणार्धात सोडून जाणं

काय मनस्थिती असेल त्यांची
असा निर्णय घेताना
फक्त एकच मार्ग दिसत असेल का
समस्यांवर उपाय शोधताना

का नाही येत विचार मनात
मागे राहणाऱ्या कुटुंबाचा
की अशा वेळी स्वार्थ डोकावतो
आणि विसर पडतो नात्यांचा

करत नसेल का कुणीच मदत
की सांगतच नसतील ते कुणाला
कुणापुढे हात पसरण्याऐवजी
जवळ करत असतील ते यमाला

इतका मातीमोल आहे का जन्म
की सहज संपवतो आपण
जिने नऊ महिने उदरात सांभाळलं
तिचा अपमानच करतो ना आपण

© PRATILIKHIT

14170cookie-checkसमर्पण

Related Posts

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

ओळख

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 117,980 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories