Uncategorized
महाराष्ट्र दिन

होऊनी हर्षित गातो आम्ही
थोरवी महाराष्ट्राची
नमन तुजला करीतो आम्ही
तू पवित्र भूमी संतांची
पाहिलेस तू परकीय स्वकीय
झेलल्या किती यातना
उद्धरिण्या तुज शिवबा आला
जागविली नवचेतना
माळ दुर्गांची शोभते कंठी ही
लखलखती माणिकमोती
उभा सह्याद्री पाठीशी मग
काय कुणाची भीती
मूळ भाषा मराठीच ती
नांदते सर्वाघरी
रुपडे नवे ती धारण करिते
बदलून वरचेवरी
पंढरीच्या वाळवंटी
संथ वाहे चंद्रभागा
येता पाऊस भेटावया ती
उगा करितसे त्रागा
इतिहास हा ज्वलंत याचा
अन पिंड लढावैयाचा
करीतसे मी नमन तुजला
तू प्रणाम घ्यावा माझा
© PRATILIKHIT
No Comment