Go Corona Go

Go Corona Go

चायनाच्या या करामतीचा
संपूर्ण जगाने घेतलाय धसका
बाकी सगळं डुप्लिकेट यांचं
पण व्हायरस मात्र निघाला पक्का

सगळीकडे नुस्ते सॅनिटायझर आणि मास्क
डॉक्टर आणि नर्सेसचं वाढलंय काम
एरवी हात जोडल्यावर हसणाऱ्यांना
हात मिळवायलाही फुटतोय घाम

कोरोनाच्या या व्हायरस ची
काहीतरी नक्कीच आहे गोम
मेख काही सापडत नाही
कंपन्या देतायत वर्क फ्रॉम होम

एवढ्याश्या त्या जीवाने
मानवाला मात्र जमिनीवर पाडलं
सर्व जाती धर्म विसरून
माणूस म्हणून एकत्र आणलं

पुरे झाली गंमत आता
थोडं गांभिर्याने घेऊया
स्वतःसोबत थोडीशी
इतरांचीही काळजी घेऊया

© PRATILIKHIT

12020cookie-checkGo Corona Go

Related Posts

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

ओळख

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,879 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories