होळी रे होळी

होळी रे होळी

होळी रे होळी….पुरणाची पोळी….साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी…

काय ??? आठवली की नाही लहानपणी खेळलेली होळी. दिवाळी, गणपती नंतर हा एक असा सण ज्याची मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच जास्त आतुरता असते. त्यांची होळी किमान आठवडाभर तरी आधी सुरू होते. शाळेत रंग आणायला परवानगी नसली तरी गुपचूप रंगाच्या पुड्या बांधून कुणाच्या तरी शर्टमध्ये टाकण्यात बच्चेकंपनी पटाईत असते.जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा होळी ह्या सणाला आजच्यासारखं व्यावसायिक रूप प्राप्त झालेलं नव्हतं. जो तो आपापल्या गावात, आपापल्या चाळीत किंवा बिल्डिंगमध्ये रंग खेळायचा. आपल्या परिसरात, आपल्या लोकांबरोबर होळी खेळायचा जो आनंद आहे तो पैसे देऊन कोणत्यातरी भाड्याच्या कार्यक्रमात जाऊन खेळल्याने कसा येईल???

मी लहानपणापासूनच एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेलो आहे. त्यामुळे दिवाळी, गणपती, होळी, नवरात्री असे जितके सण आहेत ते सगळे आम्ही सर्व भाऊ बहीण सर्वजण एकत्र येऊन साजरे करतो. आमची रंगपंचमी ची तयारी तर आदल्या दिवसापासूनच सुरू व्हायची. शाळेतून आल्यावर सगळे जण दुसऱ्या दिवशीच्या युद्धासाठी तयार व्हायचे. छोट्या फुग्यांची पाकिटं च्या पाकिटं आदल्या दिवशी रंगीत पाण्याने फुगवून तयार असायची. फुगे फुटू नये म्हणून बादल्यांमध्ये पाणी भरून त्यात सगळे फुगे अलगतपणे टाकून ठेवायचो.

रात्री होलिकादहन व्हायला उशीर व्हायचा. दोन तीन वाजेपर्यंत जागरण करूनसुद्धा सगळी मंडळी सकाळी उठून रंगपंचमी साठी तयार असायची. आम्हा लहान मुलांची रंगपंचमी तर सकाळी सात वाजताच सुरू व्हायची. रंगपंचमीचा आमचा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे बाजुला असलेल्या बिल्डिंगमधल्या मुलाबरोबर खुन्नस देत रंगपंचमी खेळणे. पाठीवर पिचकारीची बंदूक बांधून आणि हातात फुग्यांचे बॉम्ब घेऊन आम्ही सगळे युद्धासाठी तयार असायचो. एका बाजूने सुरुवात झाली की दुसऱ्या बाजूने फुग्यांचा तुफान वर्षाव व्हायचा. कुणाच्या तरी आईवडिलांनी हस्तक्षेप करेपर्यंत हे युद्ध सुरू असायचं.

साधारण दहा साडेदहा वाजता सगळी मोठी मुलं रंग खेळायला यायची. तो पर्यंत आमचा सगळा रंगांचा, फुग्यांचा स्टॉक संपलेला असायचा. मग कुणी त्यांच्या तावडीत सापडला की त्याचा अगदी इंद्रधनुष्य होऊन जायचा. सगळे जण मग एकत्र होळी खेळायचे. तेव्हा कॅमेरावाले मोबाईल वगैरे नव्हते त्यामुळे त्या सगळ्या गमतीजमती आमच्या सगळ्यांच्या आठवणींमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत.

आताही होळी सर्वत्र उत्साहात साजरी होते. पण रंगाचा बेरंग होण्याची घटना कुठे ना कुठे घडतेच. रासायनिक रंगांमुळे कुणाचा डोळा निकामी होतो तर कुणाच्या त्वचेला अपाय होतो. त्यामुळे हल्ली eco friendly रंग वापरण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यातच संपुर्ण जगावर Corona चं संकट ओढवलंय. एकीकडे दिवसभर sanitizer ने आंघोळ करत असताना उद्या उत्साहाच्या भरात स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला विसरू नका..

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.

© PRATILIKHIT

11940cookie-checkहोळी रे होळी

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories