IT Life
” Hey..Any plans for the weekend..”
” Yes bro.. Going home..”
आपल्या घरापासून लांब राहून आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये वरचेवर घडणारं संभाषण. इथे प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट असते. अगदी जॉबच्या पहिल्या दिवसापासून स्ट्रगल सुरू होतं. बहुतेक आयटी कंपन्या ह्या मुंबई, दिल्ली, बंगलौर अशा शहरात असतात.मग तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या भागात राहत असाल तर नव्या शहरात येऊन राहणं आपसूकच आलं. मग त्या नवीन शहरात राहण्यासाठी जागा शोधण्यापासून ते त्या शहराची सवय होईपर्यंत बरीच तारेवरची कसरत करावी लागते. कधी मुख्य शहरात राहणं खिशाला परवडत नाही म्हणून मग शहरापासून थोडं दूर राहावं लागतं. काही जणांचं घरच शहरापासून लांब असतं मग त्यांचं अर्ध आयुष्य प्रवासातच निघून जातं.
मागे माझ्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्राम वर स्टोरी टाकली होती की ‘ Don’t talk about struggle if you can’t get up at 4 am for work ‘. आणि त्या स्टोरी वर अनेक जणांनी आपल्या सुप्त भावना व्यक्त केल्या. इथे प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे..कुणाला ऑफिसला जाण्यासाठी पहाटे लवकर उठावं लागतं, कुणी त्याच वेळेला नाईट करून दमूनभागून घरी येत असतं. कुणी पाच मिनिटांत ऑफिसला पोहोचतं तर कुणाला दोन तीन तासाचा प्रवास करावा लागतो..त्यात जर तुम्ही फिटेनस वगैरे बद्दल जागरूक असाल तर मग तुम्हाला अजून थोडं लवकर उठावं लागतं. कुणी विकेंडला आपल्या घरी आलं असेल तर सोमवारी वेळेवर ऑफिसला पोहीचण्यासाठी त्यांना मध्यरात्रीच घराबाहेर पडावं लागतं.
आयटी लाईफशी साधर्म्य दर्शवणारी ‘ cubicles ‘ ही वेबसिरीज नुकतीच युट्युब वर येऊन गेली. त्याची लिंक हवी असल्यास लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
बऱ्याचदा होतं असं की जर तुम्ही तुमच्या कामात चांगले असाल तर कामाचा बराचसा भार तुमच्यावरच पडतो. येण्याची वेळ नक्की असते पण जाण्याची वेळ कधीच लवकर येत नाही. सारखं सारखं डेस्क वर बसून तुम्हाला कॉम्प्युटर शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तुम्ही वर्षभर जरी वेळेवर आलात तरी तुमचं कुणीही कौतुक करणार नाही पण एक दिवस तुम्ही थोडं लवकर निघालात तर लगेचच लोकं ‘ अरे…आज हाफ डे…’ असं बोलून मोकळी होतात. बऱ्याचदा आयुष्यात काय हवं हेच तुम्हाला माहीत नसतं. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं तुम्ही फक्त दिलेलं काम करत असता. कुणाला सांगितलं ना की तुम्ही आयटी मध्ये काम करता तर त्यांच्यासमोर मात्र एकदम गुगल, फेसबुकचं चित्र उभं राहतं.
प्रत्येकालाच त्याला हवं तसं लाईफ मिळेलच असं नाही. स्ट्रगल तर पाचवीलाच पुजलेलं. नवीन टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही जुळवून घेतलं नाही की तुम्ही आऊटडेटेड होता. बरं पॅशन ला प्रोफेशन बनवायचं तर त्याचीही हिंमत होत नाही कारण कमी होत चाललेल्या संधी आणि वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या..मग अशावेळी फक्त एकच पर्याय राहतो तो म्हणजे आहे ते रुटीन फॉलो करणं आणि विकेंड ची आतुरतेने वाट पाहणं…
© PRATILIKHIT
https://youtu.be/JbBsqmKclXE (Cubicles )
Yup life happens in between those weekdays and next monday !!
Exactly