Articles
फरक
इतरांचा एकटेपणा दूर करण्यासाठी आपण किती तत्पर असतो. कुणी साधं नकारात्मक स्टेटस जरी टाकलं तरी आपण त्याला खोदून खोदून विचारतो.
पण स्वतःला होणाऱ्या त्रासाचं काय हो???
एकटं राहणं आणि एकटेपणाची भावना मनात निर्माण होणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. माणसाला जेव्हा एकटं राहायला वाटतं तेव्हा तो साधारणपणे रोजच्या कटकटीला, ताणतणावाला कंटाळलेला असतो. अशा वेळी त्याने जरूर एकटं राहावं. त्यामुळे स्वतःची एक वेगळीच ओळख होते आपल्याला…
पण जर एकटेपणाची भावना मनात निर्माण होत असेल तर त्याबाबतीत कुणाशी तरी बोलणं अनिवार्य असतं आणि ते टाळू नये..कारण एकदा का पाण्याचा बांध फुटला की त्याच्या लोंढ्याने गाव कधी वाहून जाईल समजणार सुद्धा नाही.
©PRATILIKHIT
👍👍👍