Uncategorized
भेट
पुन्हा तिची भेट होणं म्हणजे
एक भलताच उत्साह अंगी असतो
दोन तीन दिवसांचा विरह सुद्धा
एखाद्या युगा प्रमाणे भासतो
या वेळी मात्र मी
ठिकाण बदलायचं ठरवलं
किती वेळा तिथेच जाणार
दोघांचही मत पडलं
मी तसा बऱ्यापैकी वक्तशीर
ती नेहमीच उशीर करते
वाटेत येणाऱ्या सगळ्यांना भेटून
मग माझ्या शेजारी बसते
बराच वेळ वाट पाहिली
शेवटी एकदाची ती येताना दिसली
मी स्वागताला उभा राहणारच होतो
तेवढ्यात वेटर ने प्लेट पुढ्यात सरकवली
ती म्हणजे माझी चिकन थाळी..
© PRATILIKHIT
No Comment