Uncategorized
व्यस्त झालंय आयुष्य
खूप व्यस्त झालंय आयुष्य
काय करावे कळत नाही
सतत कामाची टांगती तलवार मानेवर
निवांत वेळ काही मिळत नाही
आठवड्याभराच्या कटकटीला
कधीतरी आम्हीही वैतागतो
माणसाने केलेल्या प्रगतीला मग
उगाच दोष देत बसतो
सणासुदीच्या दिवशी तर आम्ही
मनावर दगड ठेवुनच बाहेर पडतो
प्रायव्हेट मध्ये पगार घेऊन
स्वप्न मात्र सरकारी सोयीची बघतो
आठवड्याभराच्या थकव्याचा
मग होतो एकदाचा THE END
क्षणभर का होईना सुखावतो
ऐकून शब्द WEEKEND
© PRATILIKHIT
No Comment