Uncategorized
विश्वचषकाचे वारे
दर चार वर्षांनी
वारे वाहतात विश्वचषकाचे
राष्ट्रीय खेळ जरी असला
तरी अतूट नाते भारतीयांचे
भारत पाकिस्तान मॅच म्हणजे
आमच्यासाठी दुसरं कारगिल असतं
प्रतिष्ठेच्या या लढतीत
आम्हाला फक्त जिंकायचंच असतं
अगदीच जर मागे पडलो
तर देवही पाण्यात ठेवले जातात
घरी चॅनेल नाही म्हणून
दुकानासमोरच रांगा लागतात
क्रिकेटवेड्या अशा या देशात
खेळाडूंचे फोटो देव्हाऱ्यात लागतात
निदान खेळाच्या निमित्ताने तरी
जात धर्म बाजूला सारले जातात
© PRATILIKHIT
No Comment