Uncategorized
तसा पावसाचा मला कंटाळाच
तसा पावसाचा मला कंटाळाच
पण तिला मात्र खूप आवडायचा
चुकून छत्री घरी विसरली
की तिचा आनंद ओसंडून वाहायचा
तिच्यासोबत भिजायला मिळावं
म्हणून मी ही छत्री लपवून ठेवायचो
पावसात भिजून आजारी पडल्यावर
घरी आईचा ओरडा खायचो
नातं आम्हा दोघांमधलं
पाऊस आणि सूर्यप्रकाशासारखं होतं
मात्र इंद्रधनुष्य दुसऱ्याच्या वाटेला येईल
असं कधी वाटलंच नव्हतं
पावसात चिंब भिजायची इच्छा
तिच्या जाण्यानेच विरून गेली
रिमझिम बरसणाऱ्या जलधारांची
ओघळणाऱ्या अश्रूंना सोबत झाली
© PRATILIKHIT
No Comment