Uncategorized
37
आयुष्याच्या वाटेवर चालता चालता
कधीतरी आपण एकटे पडतो
ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा असते
तोच ऐनवेळी हात सोडतो
कितीही खंबीर असलो तरीसुद्धा
अशावेळी मात्र मन घाबरतं
बिकट प्रसंगांतून वाट काढताना
स्वतःलाच हरवल्यागत होतं
नेहमी मनात विचार येतो
की अनुभवातून काहीतरी शिकावं
कटू आठवणींना बाजूला सारून
पुन्हा एकदा नव्याने जगावं
कितीदा ठेच खाल्ली असेल मी
तरीसुद्धा पुन्हा तेच घडतं
माहीत असतं की मृगजळ आहे
तरी मन मात्र तिथेच रमतं
© PRATILIKHIT
No Comment