आठवड्याचे दिवस सात
आठवड्याचे दिवस सात
शनिवार रविवार आवडते भाऊ
बाकी पाच संपता संपता
येतात सगळ्यांच्या नाकी नऊ
पहिला वार सोमवार
सगळ्यांच्या मनावर टांगती तलवार
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर
पुन्हा ती लोकल,बस ची मारामार
त्यानंतर येतो मंगळवार
आमच्या अंगी मात्र भलताच आळस
का करतोय नोकरी असं स्वतःशीच म्हणत
कसा तरी ढकलला जातो दिवस
बुधवारी मात्र आम्हाला
डब्याची अजिबात चिंता नसते
काहीतरी चांगलं असणार आज
डब्याबाहेर आलेलं तेलच सांगते
गुरुवार येताच सर्वांना
साबुदाणा खिचडी हवी असते
काही जणांचा उपवास
पण त्यांच्याच डब्याजवळ गर्दी असते
येता वार शुक्रवार
भूक सपाटून लागलेली असते
जवळच्याच कोणत्या तरी हॉटेलमध्ये
चिकनथाळी वाट पाहत असते
शनिवार येताच आम्ही सावकार बनतो
कर्कश वाजणाऱ्या गजराला ऐटीत फाट्यावर मारतो
दहा वाजले तरी आज उठायची घाई नसते
कारण आज लेट मार्कचं काही टेन्शन नसते
रविवार जसा उजाडतो
तशी आठवडा संपल्याची चाहूल लागते
उद्या पासून परत तेच रुटीन
या विचारानेच मन खट्टू होते.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
खूप सुंदर लिहिलय
Thank you