परफेक्ट लाईफ

 

Life isn’t perfect because a perfect life doesn’t exist असं म्हणतात. पण तरी सुद्धा सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या लाईफचा आपण हेवा करत असतो आणि आपली तशी का नाही म्हणून स्वतःलाच दोष देत असतो. पण सिनेमातल्या त्या हिरो किंवा हिरोईनची लाईफ तरी त्यांनी वठवलेल्या भूमिकेसारखी असते का ??
सिनेमात इतक्या परफेक्ट लव्ह स्टोरीज दाखवल्या जातात की सिंगल असलेल्यांनाही वाटायला लागतं की आपल्या आयुष्यातसुद्धा असं कोणी तरी असायला हवं . आणि मग सुरू होतो प्रवास तसं कोणी शोधण्याचा..कधी कधी अगदी न शोधतच सहज आपल्या पदरात पडून जातं. पण जेव्हा त्या सिनेमातल्या नटाच्या किंवा नटीच्या जागेवर आपण असतो तेव्हा आपल्याला उमगतं की अरेच्चा…ज्याची आपण कल्पना केली होती तसं इथे काहीच घडत नाहीये. आपण विचार केलेलं सगळं सोडून भलतेच काही गोष्टी आपल्याला अनुभावायला मिळतात. आणि मग लहान मुलाप्रमाणे एकदा का दुधाने आपलं तोंड भाजलं की मग आपण ताकही फुंकून प्यायला लागतो…थोडे दिवस चालतं आणि मग पुन्हा एखादा चित्रपट किंवा सिरीयल येते..आणि पुन्हा मग येरे माझ्या मागल्या..

पण आपण ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं आयुष्य हे आपल्यासमोर अगदी हिमानगासारखं मांडलेलं असतं..वर वर दिसणाऱ्या प्रसिद्धी, पैशाकडे आपण आकर्षित होतो पण त्यांच्या आयुष्याचा १/८ भाग आपल्याला माहीतचं नसतो..एखाद्या चित्रपटात परफेक्ट लव्हस्टोरी साकारण्याऱ्या नटाच्या खऱ्या आयुष्यातच त्याचे दोन तीन घटस्फोट झालेले असतात..मग कसला परफेक्ट आणि कसलं काय…केवळ मृगजळ…

आदर्श ठेवावा पण आपण त्यांचं सगळंच अनुकरण करत बसलो तर मग आपलंही आयुष्य आपण दुःखी करून घेतो..एखाद्याला फॉलो करताना आंधळेपणाने फॉलो न करताना चांगलं काय वाईट काय याचं भान असणंही तितकच आवश्यक आहे..आणि तसं केलं तर आपल्याला आपलं आयुष्यही सुंदर आणि मजेशीर करता येईल.

 

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6400cookie-checkपरफेक्ट लाईफ

Related Posts

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान

CAA कायदा म्हणजे काय??

CAA कायदा म्हणजे काय??

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,543 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories