नियती पर्व दुसरे….भाग १३

” रश्मी…..उठतेस का ??? आठ वाजत आले. ”
” अरे…आठ वाजले पण पटकन…” रश्मी डोळे चोळत म्हणाली.
” मी काय म्हणते….” आईने चादराची घडी करत विचारलं ” आज ऑफीसला नाही गेलीस तर नाही चालणार का ?? फक्त तीन तास झोप मिळालीय तुला…आज आराम कर..नाहीतर तब्येतीला त्रास होईल.”
” नाही ग आई…आज जावंच लागणार..एवढा मोठा विकेंड होता ना…ढीगभर कामं पडली असतील..”
” बरं..आवर मग पटकन… मी तो पर्यंत तुझी आवडती कॉफी बनवते..”
” हो आलेच मी…”

रश्मी ऑफिसमध्ये आली तेव्हा अविनाश आधीच येऊन बसला होता. रश्मीला पाहताच त्याचे एक मस्त स्माईल दिली आणि पुन्हा कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसलं. रश्मीनेसुद्धा तिचा कॉम्पुटर चालू केला तेवढ्यात राज तिच्या डेस्कवर आला.
” काय रश्मी…झाली का तयारी….??”
” तयारी…कसली??” रश्मी आणि अविनाश दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
” मेल बघितले नाहीस वाटते अजून…” राज हसत म्हणाला.
” नाही..म्हणजे आता तेच बघत होते…काय झालं..”
” बघ बघ…आणि बघून झाल्यावर ये केबिनमध्ये…”
“बरं…” एवढं बोलून रश्मीने भराभर सगळे मेल वाचायला सुरुवात केली. आणि एकाएकी ती थांबली..डोळे विस्फारून तीने तो मेल पून्हा वाचला..
” अवि…”
” हा…बोल ना…”
” हा बघ..काय मेल आलाय…”
“काय??”
“वाच तरी…”

रश्मीचा चेहरा पडलेला पाहून अविनाशने पटकन मेल वाचला आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं.

” अरे वा..मस्त..congrats…”
” कसलं congrats… मला नाही जायचं इतक्या लांब…आणि तेही इतके दिवस..”
” अगं ही संधी सगळ्यांना मिळत नाही..तुला कंपनी तीन महिन्यांसाठी केरळला पाठवतेय याचा खरं तर तुला आनंद व्हायला हवा..अशी तोंड पाडून काय बसलीय वेडी…”
“तीन महिने..can you imagine… इतके दिवस मी तुझ्यापासून लांब राहणार. ”
“त्यात काय.. career is more important than anything.. आता जा…आणि शहाण्या मुलीसारखी राजला होकार सांगून ये..”
“पण अवि…”
” आता पण नाही आणि बिण नाही…जा बरं लवकर..”
” बरं….”

” राज…आत येऊ का ??”
” अरे रश्मी…ये ये…काय वाचला का मेल…”
” हो…”
” मग..जाणार की नाही केरळला??”
रश्मी गप्पच होती..तिला असं गप्प पाहून राजच पुढे म्हणाला..
” मला माहितीये रश्मी की असं एकदम तुला सांगितल्यामुळे तुला थोडंस गोंधळल्यासारखं झालं असेल पण ट्रस्ट मी की खूप चांगली संधी आहे तुझ्यासाठी. तिकडे तुला ट्रेनिंग तर मिळेलच पण जर तू चांगला परफॉर्मन्स दिलास तर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट वर काम करायची संधी सुद्धा मिळेल. तिथे फक्त आपल्या ब्रँच चे नाही जगभरातल्या ब्रँच चे एम्प्लॉयी असणार..तुला खूप शिकायला मिळेल.”
” हो..”
” मग…मी तुझा होकार समजू??”
” हो..पण मला जमेल ना…”
” का नाही…तुला जमेल म्हणूनच तुला पाठवायचा निर्णय घेतलाय ना आम्ही..खरं म्हणजे तुला आणि अविनाशला पाठवायचं ठरलं होतं.. पण अविनाशची आम्हाला इथे गरज आहे. म्हणून तुला एकटीलाच पाठवतोय..”
” अच्छा..ठीक आहे..कधी निघावं लागेल मला??”
“उद्या दुपारची फ्लाईट आहे तुझी…मला माहित होतं की तू नक्की होकार देशील म्हणून मी आधीच तुझं बुकिंग करून ठेवलंय..”
” ओके..थँक्स राज..मला एवढी मोठी संधी दिल्या बद्दल…”
” थँक्स काय त्यात…ऑल द वेरी बेस्ट..आणि तू आज लवकर निघालीस तरी चालेल..”
” ठीक आहे…”
” आणि हो..हॉस्टेल चा पत्ता वगैरे सगळं मेल मध्ये आहे..”
” हो..बघितला मी…”
” हम्म. ऑल द बेस्ट वन्स अगेन…”
” थँक्स…”

रश्मी राजच्या केबिनमधून बाहेर आली तीच मुळी तोंड पाडून..
” काय झालं ??” अविनाशने हसतंच विचारलं..
” उद्या दुपारची फ्लाईट आहे माझी…”
” काय…एवढ्या तडकाफडकी…” अविनाशने आश्चर्याने विचारलं.
” हो ना…” रश्मीने थोडा नाराजीचा स्वर लावला..

” बरं… मग आता घरी जा तू…पॅकिंग करायचीय तुला…संध्याकाळी भेटू आपण.. आणि आता चेहरा जरा हसरा ठेवा मॅडम..ही आनंदाचीच बातमी आहे..एवढी मोठी संधी मिळालीय..”
” काय फायदा..एवढी मोठी संधी आणि साधं तुझ्या सोबत सेलिब्रेशन सुद्धा करता येत नाहीये मला…”
” चालायचंच ग…सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा होत असत्या तर या जगात कोणी दुःखी असतं का.???”
” ए..तू आता फिलॉसॉफी झाडू नकोस….”
” नको ना…मग हस बघू छान…”
आता मात्र रश्मीला हसू आवरलं नाही.
” बरं चल..निघते मी..संध्याकाळी नेहमीच्या कॉफीशॉप मध्ये भेटू…bbye…take care…”

क्रमशः

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6330cookie-checkनियती पर्व दुसरे….भाग १३

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories