इंजिनिअर, डॉक्टर की आणखी काही ????
आजच एक जाहिरातीचा बोर्ड पाहिला
‘ इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे…मग आजचं जॉईन करा ______ क्लासेस आणि तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवा.’
तो बोर्ड पाहताच अनेक विचारांनी मनात थैमान घातलं. आज करिअर करण्यासाठी एवढ्या संधी उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना इंजिनिअर किंवा डॉक्टर बनण्यासाठीच प्रवृत्त करावं..ह्या अशा जाहिराती वाचून, आजूबाजूच्या लोकांचं ऐकूनच अनेक पालक आपल्या मुलांना त्या साईड ला टाकतात. मग त्याची इच्छा असो वा नसो.
जेव्हा आम्ही दहावी पास झालो तेव्हा आम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, आयटीआय याशिवाय इतर कशात करिअर करता येत हेच मुळी माहीत नव्हतं. माहीत नव्हतं म्हणण्यापेक्षा त्याबद्दल फार कमी माहिती होती आणि मार्गदर्शन करणारं सुद्धा कोणी नव्हतं.
आजच्या घडीला मुलांना इंजिनिअरिंग ला टाकताना निदान पहिले आजूबाजूला काय घडतंय याचा तरी अंदाज घ्यायला हवा. सध्याची परिस्थिती बघता जेवढ्या शाळा आहेत तेवढी इंजिनिअरिंग कॉलेज झाली आहेत. प्रत्येक कॉलेज मधून नाही म्हटलं तरी कमीत कमी ५०० इंजिनिअर तरी बाहेर पडतात. म्हणजे एका शाळेतून दहावी नंतर जेवढी मुलं बाहेर पडतात त्याच्या दुप्पट. आता एवढ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा बरं मिळणार. इंजिनिअर झाला म्हणजे लगेच बक्कळ पैसा… ते दिवस आता नाहीत. नोकरीसाठी खूप धडपड करावी लागते. आणि इंजिनिअर होऊन त्याच क्षेत्रात तरी किती जण राहतात. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्टरीकल, बायोमेडिकल इंजिनिअर ना सुद्धा आयटी मध्ये जॉब करण्याशिवाय पर्याय नाही. मेडीकलचीसुद्धा थोडीफार तीच परिस्थिती आहे. डॉक्टर झालं म्हणजे सगळंच झालं असं नाही.
मग यातलेच डॉक्टर, इंजिनिअर त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात जाऊन काम करतात. कारण त्या क्षेत्रांबद्दल त्यांना की इतर लोकांना फार माहिती नव्हती. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणारी सुद्धा अनेक मंडळी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या क्षेत्रात करिअर करू शकतो.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे करिअर निवडताना थोडा विचार करून निवडा. उगाच प्रवाहाबरोबर जायचं म्हणून सगळे करतात ते करायचं आणि मग जॉब ला लागल्यावर जर त्या कामात इंटररेस्टच नसेल तर काय फायदा…हा विचार नंतर करण्यापेक्षा आधी केलेला केव्हाही चांगला.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment